Lok Sabha Election 2024 : मुनगंटीवार - वडेट्टीवार यांच्यानंतर आता तिसरे ‘हे’ वार अचानक आले चर्चेत !

Sudhir Mungantiwar : काही दिवसांपासून सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील, अशा चर्चा झडत आहेत.
Vijay Wadettiwar, Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar
Vijay Wadettiwar, Sudhir Mungantiwar and Kishor JorgewarSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा महाराष्ट्रात एकाही पक्षाने अद्याप केलेली नाही. अशात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसेच आहे. येथे भाजपने याvवेळी उमेदवार बदलाचे संकेत दिले आहेत. तसेच संकेत काँग्रेसकडूनही मिळू लागले आहेत.

सुधीर मुनगंटीवार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यपालन विभाग मंत्री आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील, अशा चर्चा झडत आहेत. यासंदर्भात त्यांनी यापूर्वी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली आहे. पक्षाने आदेश दिल्यास नक्कीच लढू, असे त्यांनी सांगितलेले आहे. पण मनातून त्यांची लोकसभा लढण्याची इच्छा नसल्याचे त्यांचे निकटतम लोक सांगतात. पण पक्षादेश झाला तर ते मागे हटणार नाही, असेही सांगितले जाते.

काँग्रेसकडून स्व. बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आधीच चंद्रपूर लोकसभेवर दावा केलेला आहे. बाळू धानोरकरांनंतर या जागेवर त्यांचाच दावा चालेल, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. असे असताना राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभेवर दावा ठोकला आहे. आधी त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार, असे सांगण्यात येत होते. पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, आता विजय वडेट्टीवार स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar, Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar
Sudhir Mungantiwar : वाघ नखानंतर मुनगंटीवार यांचा 'दांडपट्ट्यां'नी वार

काँग्रेस कमिटीने तीन नावे चंद्रपूरसाठी पाठविल्याचे सांगण्यात येते. त्यामध्ये विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती आहे. विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांची कन्या शिवानी यांच्यासाठी वेगळा विचार केला जाऊ शकतो. चंद्रपुरात लोकसभा मतदारसंघात मुनगंटीवार - वडेट्टीवार यांच्यात लढत होणार असल्याच्या चर्चा कालपासून सुरू झाल्या. त्यात आता चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून देशात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचेही नाव अचानक चर्चेत आले आहे.

काल (ता. 6) किशोर जोरगेवार यांचा नियोजित दौरा मुंबईचा होता. पण अचानक त्यांनी मुंबईचे विमान सोडून दिल्लीचे विमान पकडले. तेव्हापासून आमदार जोरगेवार आता लोकसभा लढणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. जोरगेवार अपक्ष आमदार आहेत. सर्व जाती समूहांतील लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. चंद्रपुरात त्यांनी राबवलेले उपक्रम चांगलेच चर्चेत राहिले. महाकाली महोत्सव असो की, त्यांना ‘अम्मा का टिफीन’ उपक्रम अशा इतर उपक्रमांमुळे ते सतत चर्चेत असतात. अचानक दिल्लीला गेल्यामुळे आमदार जोरगेवार यांचे नाव लोकसभेसाठी अचानक तर समोर येणार नाही, या चर्चेने जोर धरला आहे.

आठवला नितीन गडकरींनी सांगितलेला ‘तो’ किस्सा...

एका कार्यक्रमात नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर होते. तेव्हा गडकरींनी पवारांचा एक भन्नाट किस्सा सांगितला होता. ‘पवारसाहेब दिल्लीला जायला निघाले तरी त्यांच्यावर विश्‍वास ठेवायचा नसतो. कारण ते नेमके कुठे जाणार हे कुणीच सांगू शकत नाही. जोपर्यंत त्यांचे विमान उडत नाही, तोपर्यंत ते दिल्लीला चालले की काेलकात्याला, हे कुणी सांगू शकत नाही.’ हा किस्सा अनेकांना आठवला. या किश्श्याप्रमाणेच काहीसे काल (ता. 6) आमदार जोरगेवारांच्या बाबतीत घडले. निघाले तर मुंबईला जाण्यासाठी, पण ऐन वेळी दिल्लीचे विमान पकडले.

Edited By : Atul Mehere

R

Vijay Wadettiwar, Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar
Sudhir Mungantiwar News : आधे इधर जाओ, आधे उधर जाओ; मुनगंटीवार असं कुणाला म्हणाले ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com