Sudhir Mungantiwar : वाघ नखानंतर मुनगंटीवार यांचा 'दांडपट्ट्यां'नी वार

Shivaji Maharaj Dandpatta State Armory : मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ आता होणार ‘राज्यशस्त्र’
Eknath Shinde,Devendra Fadnavis,  Sudhir Mungantiwar, Raosaheb Danve
Eknath Shinde,Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar, Raosaheb DanveSarkarnama

Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांनी आपल्या अभूतपूर्व साहसाचा परिचय देत औरंगजेबाला "सळो की पळो" करून सोडले. महाराजांच्या संपूर्ण वाटचालीत त्यांच्या विश्वासू मावळ्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेला ‘दांडपट्टा’ आता 'राज्यशस्त्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रा येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात ही घोषणा केली आहे .

शिवभक्त विनोद पाटील यांच्या पुढाकाराने शिवजयंतीच्या पर्वावर आग्रा किल्ल्यातील "दिवाण ए खास" येथे भव्यदिव्य कार्यक्रम घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, शिवाजी महाराजांचे वंशज तथा राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची या वेळी विशेष उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde,Devendra Fadnavis,  Sudhir Mungantiwar, Raosaheb Danve
Navneet Rana: इम्तियाज जलील हे ओवेसींचे चमचे, हिंमत असेल तर अमरावतीमधून लढा; राणा कडाडल्या...

देशाच्या इतिहासात आग्रा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. याच किल्ल्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचे संपूर्ण मनसुबे उधळवून लावले होते. शिवाजी महाराजांचे आपल्या मावळ्यांवर विशेष प्रेम होते. मावळ्यांनीही वेळोवेळी महाराजांच्या खांद्याला खांदा लाऊन त्यांचा विश्वास सार्थ ठरविला होता. मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ हा त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक ठरला आहे. आता या दांडपट्ट्याला ‘‘राज्यशस्त्र’’ हा दर्जा बहाल करण्यात आला. आग्रा येथील "दिवाण ए खास"मधून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा करताच उपस्थित शिवभक्तांनी टाळ्यांच्या गजरात निर्णयाचे स्वागत केले. या वेळी दांडपट्ट्याचे पूजनही करण्यात आले.

या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रा येथे होत असलेला हा कार्यक्रम ऐतिहासिक असल्याचे म्हटले. महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीची साक्ष देणाऱ्या या ठिकाणी दरवर्षी हा उपक्रम व्हावा, असा आशावाद त्यांनी या वेळी व्यक्त केला. खासदार उदयनराजे भोसले यांनी या वेळी 'स्वराज्य सर्किट'ची निर्मिती करण्याची मागणी केली. सोबतच दिल्ली येथे महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती करावी, असेही ते म्हणाले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने या मागणीची दखल घेत गडकिल्ल्याचे संवर्धन आणि जतन करण्याची ग्वाही दिली.

मराठा शस्त्रांमध्ये ढाल तलवार, पट्टा, भाला, कट्यार, वाघ नखे, धनुष्यबाण, ठासणीच्या बंदुका व तोफा यांचा समावेश होता. या शस्त्रात दांडपट्ट्याचादेखील समावेश होता. दांडपट्टा हे एक वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहे. आता मावळ्यांचा या दांडपट्ट्याला ‘‘राज्यशस्त्र’ चा दर्जा मिळाला आहे. या निर्णयाने महाराजांच्या मावळ्यांचा आता मोठा सन्मान करण्यात आला आहे. येणाऱ्या पिढीसाठी हा महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde),उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) , शिवाजी महाराजांचे वंशज तथा राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची या वेळी विशेष उपस्थिती होती.

R

Eknath Shinde,Devendra Fadnavis,  Sudhir Mungantiwar, Raosaheb Danve
Sameer Bhujbal : महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत महायुतीत चर्चाच नाही; समीर भुजबळ यांचा गौप्यस्फोट...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com