Amravati Lok Sabha: राणा, महायुतीची डोकेदुखी काही केल्या थांबेना; आधी कडू अन् आता मिटकरी...; वादाचा नवा अध्याय!

Amravati: एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह महायुतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीनिशी नवनीत राणांचा प्रचार करत आहेत, तर दुसरीकडे युतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राणांवर नाराज झाला आहे.
Navneet Rana, Amol Mitkari
Navneet Rana, Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Amravati Lok Sabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रहारचे बच्चू कडू (Bachchu Kadu) विरुद्ध राणा दाम्पत्य हा वाद जोरात सुरू असतानाच आता महायुतीतील मित्रपक्षानेच नवनीत राणा यांना इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये सर्व काही आलबेल नाही की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. (Amravati Lok Sabha Constituency)

महायुतीच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहेत. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप आणि महायुतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीनिशी नवनीत राणांचा (Navneet Rana) प्रचार करत आहेत, तर दुसरीकडे युतीतील मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राणांवर नाराज झाला आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराजीला कारणीभूत ठरला आहे एक डिजिटल फ्लेक्स. तर महायुतीतील हा वाद नेमका काय आहे ते जाणून घेऊया.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवनीत राणा यांची आज अमरावतीमध्ये प्रचार सभा पार पडली. सभेसाठी उभारण्यात आलेल्या भल्यामोठ्या व्यासपीठावर एक डिजिटल फ्लेक्स लावण्यात आला होता. मात्र, या डिजिटल फ्लेक्सवर आणि सभास्थळी कुठेही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि युतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला नव्हता. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नाराजी दर्शवली आहे.

Navneet Rana, Amol Mitkari
Amit Shah : फडणवीस आणि शाह यांनी दिली शरद पवारांना माफीची लिस्ट....

आपण महायुतीचा धर्म विसरला आहात

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सभास्थळी लावण्यात आलेला फ्लेक्स दिसत आहे. शिवाय व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, "नवनीत राणाजी आपण महायुतीचा धर्म विसरला आहात. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागेल." मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून थेट नवनीत राणांना इशाराच दिल्याचं पाहायला मिळत आहे.

मिटकरींना शरद पवार गटाने डिवचलं

अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) ट्विट केलेला व्हिडिओ रिट्विट करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अजित पवार गटाला डिवचलं आहे. शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांनी मिटकरींचं ट्विट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, "असं नाही.. नीट रडायचं ! मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल." असं ट्विट करत जगताप यांनी अजित पवार गटाला डिवचण्याचं काम केल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे नवनीत राणांच्या इथून पुढच्या सभांमध्ये अजितदादांचा फोटो दिसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, सध्या राणांच्या कृतीमुळे अजित पवार गट नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com