Lok Sabha Election 2024 : बीआरएसचे नेते अन् आंबेडकर यांच्यात बंद दाराआड खल; लोकसभेचं गणित काय?

Prakash Ambedkar And Maharashtra BRS : प्रकाश आंबेडकर आणि कदीर मौलाना भेटीदरम्यान बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांची फोनवरही चर्चा झाली.
Prakash Ambedkar, KCR
Prakash Ambedkar, KCRSarkarnama
Published on
Updated on

Akola Political News : तेलंगणाची सत्ता गमावल्याच्या दुःखातून भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस आता सावरू लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत बीआरएसने लक्ष घातले आहे. बीआरएस (BRS) नेते कदीर मौलाना आणि प्रवीण जेठेवाड यांनी गुरुवारी (ता. 21) वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. अकोल्यातल्या आंबेडकरांच्या 'यशवंत भवन' या निवासस्थानी आंबेडकर आणि कदीर मौलाना तसेच जेठेवाड यांची 30 मिनिटांहून जास्त वेळ बंद दाराआड चर्चा झाली. Lok Sabha Election 2024

खासदार इम्तियाज जलील (Imtiyaaz Jaleel) यांचे कट्टर राजकीय विरोधक कदीर मौलाना यांना संभाजीनगरातून उमेदवारी देण्याचा विचार बीआरएसचा सुरू होता. दरम्यान, राष्ट्रवादीतून काँग्रेसमधून बीआरएसमध्ये प्रवेश केलेल्या कदीर मौलाना यांचा राजकीय आलेख फारसा उंचावणारा नाही. मात्र, संभाजीनगरचे विद्यमान खासदार यांचे राजकीय विरोधक म्हणून त्यांचे नाव पुढे येत आहे.

Prakash Ambedkar, KCR
Owaisi On Shah : 'मजलीस को उखाड के फेको गे क्या' म्हणणाऱ्या शाहांना ओवेसींचं सडेतोड प्रत्युत्तर; 'भाजपचं अस्तित्व...'

प्रकाश आंबेडकर आणि कदीर मौलाना यांच्या भेटीदरम्यान आंबेडकर आणि बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव (KCR) यांची फोनवरही चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान नेमक्या काय गोष्टी झाल्यात हे मात्र समजू शकल्या नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बीआरएस नेमका काय डाव टाकणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात मौलाना यांना उरवून इम्तियाज जलील यांची बीआरएस त्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदीर मौलाना यांनी आंबेडकरांची (Prakash Ambedkar) भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच बीआरएसने आंबेडकरांपुढे मैत्रीचा हात ठेवल्याचे समजत आहे. आता प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काय असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Prakash Ambedkar, KCR
Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लुडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com