Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लुडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...

Supriya Sule Vs Rupali Chakankar : महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या चाकणकरांनी स्वतःवर कधी समाजमाध्यमांमधून टीका टिप्पणी झाली तरच अधिकाराचा वापर केला.
Sushma Andhare, Rupali Chakankar
Sushma Andhare, Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : बारामतीत लोकसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. महायुतीच्या निश्चित मानलेल्या सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर सडकून टीका केली. लग्न करून दिल्यानंतर मुलीने माहेरी लुडबूड करू नये, अशा शब्दांत चाकणकरांनी सुळेंवर वार केले. चाकणकरांनी केलेल्या या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या चाकणकरांनी (Rupali Chakankar) एका महिलेच्या अधिकारावर केलेले विधान अत्यंत चिंताजनक असल्याचे अंधारेंनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत आपण खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल तावाने बोललात. यात तुमचा स्वार्थ दिसून येतो. मात्र आपले, "लेकीने माहेरी लुडबूड करू नये" हे विधान महिला म्हणून तर अत्यंत निंदनीय आहे, परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून काम करणाऱ्या एका व्यक्तीने केलेले वक्तव्य म्हणून चिंतनीय आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sushma Andhare, Rupali Chakankar
Vasant More News : 'इस शहर में दबदबा है हमारा...'; वसंत मोरेंचा नेमका कुणाला इशारा ?

रूपालीजी महिला आयोग म्हणून आपण जेव्हा कधी अधिकार वापरले ते फक्त आणि फक्त स्वतःवर कधी समाजमाध्यमांमधून टीका टिप्पणी झाली तर त्यासाठी म्हणून ते वापरले गेले. पण इतर महिलांवर कधी जर अभद्र टिप्पणी झाली तर आपण कधीही स्वतःहून त्याची दखल घेतली नाही. कारण अशा काळात जेव्हा एखादी महिला सैरभैर होते अडखळते.. अडते.. नडते.. तेव्हा तिच्या पाठीशी ठामपणे उभे असते ते तिचं कुटुंब. सासर आणि माहेर दोन्हीकडचे लोक.. असे म्हणत अंधारेंनी (Sushma Andhare) चाकणकरांना चिमटाही काढला.

Sushma Andhare, Rupali Chakankar
Shirdi Lok Sabha 2024: MNS च्या एन्ट्रीने शिर्डीत 'शिवसेने'सह 'रिपाइं'ची डोकेदुखी

कित्येक कुटुंबांमध्ये आपल्या वृद्ध माता-पित्यांची काळजी त्यांची अपत्ये घेतात. मात्र, ज्यांना एकच अपत्य आहे आणि ती मुलगी असेल तर त्या वृद्ध माता-पित्यांची काळजी कुणी बरे घ्यायला हवी? असा प्रश्न उपस्थित करत अंधारेंनी चाकणकरांना चांगलेच सुनावले. त्या म्हणाल्या, सुळे या पवारांच्या (Sharad Pawar) एकुलत्या एक कन्या आहेत. अशा स्थितीत आपल्या 84 वर्षे वयोवृद्ध पित्याला अनेक आजारांनी ग्रासलेले असताना त्यांना आधार कुणी दिला पाहिजे? रक्ताच्या नात्यातील लोकांनी केलेले वार झेलणाऱ्या आपल्या बापाला आधार देणारी लेक म्हणजे लुडबूड असे तुम्हाला वाटत असेल तर संवेदनशीलता हा शब्द तुम्हाला नव्याने शिकवण्याची गरज आहे.

तुमचा आणि अशा माणुसकीचा फार परिचय झालेला दिसत नाही. आपल्यात थोडी सहसंवेदना शिल्लक असेल आणि अमूक एका पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नाही तर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या पदाची गरिमा आणि राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वसा वारसा कळत असेल तर आपण आपले शब्द परत घ्याल, अशी अपेक्षा आहे, अशी अपेक्षाही अंधारेंनी व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sushma Andhare, Rupali Chakankar
Manoj Jarange News: 'शिंदे-फडणवीसांनी खोटं बोलून डाव साधला, आचारसंहिता संपल्यावर गाठ माझ्याशी...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com