Lok Sabha Election 2024 : ...अखेर वडेट्टीवारांनी दिला ‘या’ नामदेवांच्या हातात हात !

Congress Workers : कार्यकर्ते करताहेत ‘तो’ फोटो व्हायरल.
Vijay Wadettiwar and Namdev Kirsan
Vijay Wadettiwar and Namdev KirsanSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे आणि गडचिरोली मतदारसंघ काबीज करण्यासाठी काँग्रेसने आपली पूर्ण ताकद लावली आहे. काँग्रेसने निवडणुकीकरिता प्रबळ उमेदवार देण्याचा चंग बांधला आहे. सध्यातरी गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी डॉ. नामदेव किरसान व डॉ. नामदेव उसेंडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अशा राजकीय परिस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दोन पैकी एका नामदेवांच्या हातात हात दिला. अन् यानंतर पक्षीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. आता गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते वडेट्टीवार आणि नामदेवरावांचा फोटो व्हायरल करत आहेत. वडेट्टीवारांनी हात दिल्याने डॉ. किरसानच काँग्रेसची पहिली पसंती असल्याचा संदेश आता काँग्रेसकडून दूरवर पोचविला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ‘चारशे पार’चा नारा दिला आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचे लोकसभेत बोलून दाखविले. यासाठी देशभरातील एकएक जागा जिंकणे महत्वाचे आहे. त्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्ष येत्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे. अशोक नेते भाजपचे विद्यमान खासदार आहेत. ते दुस-यांदा या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. पण गेल्या पाच वर्षांत त्यांनी विशेष कामगिरी केली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar and Namdev Kirsan
जरांगेंचा उद्रेक, भर सभागृहात वड्डेवारांनी कुणाला धरलं जबाबदार ? | Vijay Wadettiwar | Jarange Patil|

काँग्रेस कार्यकर्ते गावागावांत "अब की बार, गडचिरोली मे काँग्रेस है तयार", असा नारा देत आहेत. अशात काँग्रेसकडून लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार रिंगणात असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान व डॉ. नामदेव उसेंडी या दोघांच्या नावांची चर्चा आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा सलग पराभव झाला होता. दोन्ही वेळी नामदेव उसेंडी हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यामुळे यावेळी काँग्रेस नवीन चेहरा मैदानात उतरविणार असल्याची माहिती आहे.

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात डॉ. नामदेव किरसान हे गावागावांत दौरे करत आहेत. पक्षसंघटन बांधत आहेत. अनेक कार्यक्रमांत ते सातत्याने विरोधी पक्षावर तुटून पडत आहेत़. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली ही कर्मभूमी आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाला येथूनच सुरुवात झाली होती. प्रदीर्घ काळ गडचिरोलीत त्यांचीच सत्ता होती. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी चालविली आहे.

गडचिरोलीत त्यांनी दौरे वाढविले आहेत. नुकतेच त्यांनी मार्कंडा मंदिराच्या कामाचा मुद्द्यावर लोकप्रतिनिधी व प्रशासनावर जोरदार प्रहार केला होता. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वडेट्टीवार यांचे वजन आहे. काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते आहेत. गडचिरोलीत नुकतीच काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी डॉ. नामदेव किरसान यांच्या हातात हात दिला. आता हाच फोटो कार्यकर्ते व्हायरल करीत आहेत.

Edited By : Atul Mehere

Vijay Wadettiwar and Namdev Kirsan
Vijay Wadettiwar : नाचणाऱ्यांना अंगण कमी पडत आहे, वडेट्टीवारांचा रोख कुणाकडे ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com