Pratibha Dhanorkar News: नशिबात असतं ते होतंच! बाळू धानोरकरांच्या आठवणींनी प्रतिभाताई भावूक

Chandrapur Lok Sabha Election 2024 Voting LIVE: आज त्यांची कमी क्षणोक्षणी जाणवत आहे. पण नशिबात असतं ते होतंच आणि आलेल्या सगळ्या अडचणींना सामोरं जात मी ही निवडणूक लढवत आहे. आज खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा उत्सव असून, या उत्सवात सगळ्यांनी सामील व्हा,"
Pratibha Dhanorkar
Pratibha DhanorkarSarkarnama

लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election News) पहिल्या टप्प्याच्या मतदानास प्रारंभ झाला आहे. आज देशात 16 कोटी 63 लाख मतदार या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावणार आहेत. (Lok Sabha Election 2024 News LIVE)

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघांत मतदानास सुरुवात झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर मतदान करताना भावूक झाल्या. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आठवणींनी त्या भावूक झाल्या होत्या.

“माझ्यासाठी आजचा दिवस आनंदाचा असून, दुख:चासुद्धा आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील लोकमान्य शाळेच्या बूथवर मी आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर जोडीने मतदान करण्यासाठी येत होताे. पण आज त्यांची कमी क्षणोक्षणी जाणवत आहे. पण नशिबात असतं ते होतंच आणि आलेल्या सगळ्या अडचणींना सामोरं जात मी ही निवडणूक लढवत आहे. आज खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा उत्सव असून, या उत्सवात सगळ्यांनी सामील व्हा," असे म्हणत प्रतिभा धानोरकर भावूक झाल्या.

Pratibha Dhanorkar
Sanjay Raut: राऊतांना नवनीत राणांवरील टीका भोवणार? युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उचचलं मोठं पाऊल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर विरुद्ध महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार अशी लढत आहे. या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नागपूर आणि रामटेक मतदारसंघात सुमारे दहा हजारांच्यावर पोलिस अधिकारी, कर्मचारी, निमलष्करी दल, केंद्रीय सशस्त्र दलाचा बंदोबस्त तैनात असणार आहे..केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीमुळे नागपूर मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

पहिल्या टप्प्यात तामिळनाडूतील सर्व ३९, राजस्थानमधील २५ पैकी १२, उत्तर प्रदेशातील ८० पैकी ८ आणि मध्य प्रदेशातील ६ जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच, आसाममध्ये पाच, उत्तराखंडमध्ये पाच, बिहारमध्ये चार, पश्चिम बंगालमध्ये तीन, मेघालयमध्ये दोन, अरुणाचल प्रदेशात दोन आणि मणिपूरमध्ये दोन जागांसाठी मतदान होणार आहे. पुद्दुचेरी, मिझोराम, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड आणि अंदमान-निकोबारमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. 4 जून रोजी निकाल लागणार आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com