Amravati Political News : अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचार सभेत बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली होती.
ही टीका करणं राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सतत आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. ते विरोधकांवर टीका करताना सतत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करत असतात.
अशातच काल राऊतांनी अमरावतीलमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचार सभेत बोलतना भाजपच्या उमेदवार नवनीत राणांवर (Navneet Rana) टीका केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या सभेत बोलताना राऊत म्हणाले, "ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे." राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून त्यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात येत आहे.
अशातच आता युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गाडगे नगर पोलिस स्टेशनमध्ये राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
याच सभेत बोलताना राऊत म्हणाले, ज्या बाईने हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले, मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे पहिले आणि नैतिक कर्तव्य आहे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असलं पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरेंचा आदेश आहे हे लक्ष्यात ठेवा, असं आवाहन राऊतांनी कार्यकर्त्यांना केलं.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.