Ravikant Tupkar News : "तुमचीच तंबाखू, तुमचाच चुना, मला फक्त निवडून आणा, हाच जाधवांचा धंदा," रविकांत तुपकर बरसले

Buldhana Lok Sabha Election 2024 : प्रतापराव जाधव चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. बुलडाण्यात तिरंगी लढत होणार आहे.
ravikant tupkar prataprao jadhav
ravikant tupkar prataprao jadhavsarkarnarma
Published on
Updated on

बुलडाणा म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते मातृतीर्थ सिंदखेडराजा, संत नगरी शेगाव, लोणारचं जागतिक दर्जाचं खाऱ्या पाण्याचं सरोवर... बुलडाण्याला ऐतिहासिक आध्यात्मिक आणि भौगोलिक वारसा लाभलेला आहे. यंदा बुलडाण्यात लोकसभेला शिवसेना ( ठाकरे गट ) नरेंद्र खेडेकर ( Narendra Khedekar ), शिंदे गटाचे प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav ) आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर ( Ravikant Tupkar ) यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav ) चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यातच आता रविकांत तुपकर ( Ravikant Tupkar ) यांनी जाधव यांचा खरपूस समाचार घेतला आहे. "15 वर्षे प्रतापराव जाधवांनी दिल्लीत जाऊन फक्त तंबाखू मळली का?" असा खोचक सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे. ते एका सभेत बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"प्रतापराव जाधव 15 वर्षे खासदार असून, त्यांनी काय केलं? दुर्मीळ काकांनी एखादा प्रकल्प आणला का? दूध डेअरी सुरू केली का? एखादा साखर कारखाना सुरू केला, रोजगाराचं साधन उपलब्ध केलं किंवा एखादं धरण बांधलं का?," अशा प्रश्नांची सरबत्ती तुपकरांनी केली.

"जाधवांनी 15 वर्षे दिल्लीत जाऊन फक्त तंबाखू मळली का? तुमचीच तंबाखू, तुमचाच चुना मला फक्त निवडून आणा, एवढाच धंदा जाधवांनी केला. सोयाबीन, कापूस, तरुण, रोजगाराबद्दल जाधव कधी बोलले का? बुलडाण्याच्या खासदाराचं नावसुद्धा महाराष्ट्राला माहिती नाही," अशी टीका तुपकरांनी जाधवांवर केली.

दरम्यान, 2009 मध्ये बुलडाणा हा मतदारसंघा खुला झाल्यापासून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी खासदारकीची हॅटट्रिक केली. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी राजेंद्र शिंगणे यांना 28 हजार मतांनी पराभूत केलं. 2014 मध्ये राष्ट्रवादीचे कृष्णराव इंगळे यांचा तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला, तर 2019 मध्ये पुन्हा राष्ट्रवादीच्या शिंगणेंना त्यांनी सव्वा लाखाच्या फरकानं पराभवाचं पाणी पाजलं.

मात्र, आता शिवसेना एकसंघ राहिली नाही. शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद एकत्र केली, तर ती महाविकास आघाडीपेक्षा अधिकच म्हणावी लागेल. त्यामुळे ठाकरे गट आणि रविकांत तुपकर यांचा बुलडाण्यात कस लागणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com