Lok Sabha Election 2024 : निश्‍चिंत राहा, हा जिल्हा मुकुल वासनिकांचा आहे !

Buldhana Congress Is Safe : जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी केला हा मोठा दावा.
Ashok Chavan and Rahul bondre
Ashok Chavan and Rahul bondreSarkarnama
Published on
Updated on

फहीम देशमुख

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपच्या दबावात येऊन काँग्रेस पक्षाचा हात सोडला आहे. असे असले तरी खासदार मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वात व शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने भारावलेली बुलडाणा जिल्हा काँग्रेस मात्र एकसंध असल्याचा दावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला आहे.

अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत अधिकृतरीत्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यानंतर बुलडाणा जिल्ह्यातून आमदार राजेश एकडे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोन्द्रे हेसुद्धा चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झाली. दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करीत या संदर्भात खुलासा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan and Rahul bondre
Buldhana Scam : शेळी, बोकड वाटपात लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे हात ओले

राहुल बोंद्रे म्हणाले, की अशोक चव्हाण हे दुर्दैवाने भाजपच्या दबावाचे बळी ठरले आहेत. असे असले तरी बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध असून, त्यांचा पक्ष सोडण्याचा जिल्हा काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही. १९७८ मध्ये अशीच काँग्रेस पक्षाची वाताहत झाली होती, पण पुन्हा जोमाने पक्ष निवडून आला होता. नेते गेले असले तरी जनता मात्र काँग्रेससोबत असल्याने आगामी निवडणुकीत काँग्रेस नक्कीच उभारी घेईल, असा ठाम विश्वासही जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला.

खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच मागील आठवडाभरापासून सानंदा हे खामगाव शहरात कुणालाही दिसले नाहीत. त्यामुळे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय समजले जाणारे सानंदा हेसुद्धा भाजपवासी होतील, अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच पक्ष बदलण्याच्या अंदाजाला खुद्द सानंदा यांनी फेटाळून लावले.

एकंदरीत काँग्रेसमधील "आउट गोइंग"मध्ये बुलडाणा जिल्ह्यातून कुणीही जाणार नसून पक्ष एकसंध असल्याचा दावा सध्या तरी केला जात आहे. यासाठी पक्षाकडून जिल्ह्यातील मोठे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून खात्रीही केली असल्याची माहिती आहे.

Edited By : Atul Mehere

R

Ashok Chavan and Rahul bondre
Buldhana Sanjay Kute Politics : खासदारांसमोर घडलेल्या मानापमान नाट्यानंतर भडकले आमदार कुटे !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com