Lok Sabha Election 2024 : महायुतीचे वरिष्ठ नेते आज गोंदियात, उमेदवारीवर होईल का शिक्कामोर्तब ?

Praful Patel : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल राहणार आहेत.
Praful Patel, Ajit Psawar, Eknath Shinde and Devendra Fadanvis
Praful Patel, Ajit Psawar, Eknath Shinde and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : गोंदिया-भंडारा जिल्ह्यांचे शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या 118व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपतींसह महायुतीचे वरिष्ठ नेते आज रविवारी (ता. 11) रोजी स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित कार्यक्रमात एकत्र येत आहेत. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वैद्यकीय व उच्च तंत्रशिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल राहणार आहेत. दरम्यान महायुतीचे सर्वच वरिष्ठ नेते या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याने भंडारा-गोंदिया लोकसभेच्या महायुतीचा उमेदवार ठरेल का, असा प्रश्न आता राजकीय जाणकारांना पडला आहे. गोंदिया येथील कुडवा परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते होणार आहे.

Praful Patel, Ajit Psawar, Eknath Shinde and Devendra Fadanvis
Bhandara-Gondia Politics : पटोले, डाॅ. फुके, पटेलांचा हल्ली मुक्काम जिल्ह्यातच !

गोंदिया त मेडिकल कॉलेज इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला आहे. तब्बल 15 वर्षांनी जिल्हावासीयांची स्वप्नपूर्ती होत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. मनोहरभाई पटेल जयंतीचे औचित्य साधून या मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजनाचा मुहूर्त सापडलेला आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील फळे, भाजीपाला व कृषीवर आधारित वस्तूंचे प्रदर्शन नमाद महाविद्यालयाच्या प्रांगणात ही आयोजित केली आहे. या प्रदर्शनाला सर्व मान्यवर भेट देणार आहेत.

दुसरीकडे हा सर्व शासकीय कार्यक्रम दौऱ्यात लिखित असला तरी महायुतीचे वरिष्ठ नेते गोंदियात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आहेत. या सर्व घडामोडी भंडारा-गोंदिया लोकसभेचा महायुतीचा उमेदवार ठरणार अशी चर्चा रंगत आहे. अद्याप महायुतिचा उमेदवार ठरला नाही. भाजपने सुरुवातीपासून भंडारा- गोंदिया लोकसभेवर आपला हक्क गाजविला आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ सर्वसाधारण असल्याने या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. सध्या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे खासदार सुनील मेंढे करीत आहेत. पक्ष ‘सिटिंग-गेटिंग’ हे सूत्र लावते की ‘नवा गडी, नवा राज’, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांची जोरदार मोर्चेबांधणी सध्यातरी हेच सांगत आहे. सध्या महायुतीमुळे या मतदारसंघातील समीकरणावर परिणाम होणार आहे. महायुतीत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या मतदारसंघावर दावा करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अद्याप या विषयात मौन बाळगले असले तरी जिल्ह्यात त्यांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. महायुतीच्या बैठकीत जो निर्णय होईल तो अंतिम राहील, असे ते सांगत आहेत. काँग्रेसकडून सध्या प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले वगळता कुणाचेही नाव पुढे करण्यात आलेले नाही. येत्या 8 ते 10 दहा दिवसांत हे सर्व स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. मात्र आज जयंतीनिमित्त गोंदियात सर्वच महायुतीचे नेते एकत्र आल्याने आज महायुतीचा उमेदवार ठरणार, अशी चर्चा रंगली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com