Lok Sabha Election 2024 : भंडारा-गोंदियात भाजप उमेदवारीची रेस कोण जिंकणार ?

Parinay Fuke : डॉ. परिणय फुके यांचे नाव अधिक चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले आहे. फुके यांच्यानंतर विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचे नाव चालले असल्याची माहिती आहे.
Dr. Parinay Fuke and Sunil Mendhe
Dr. Parinay Fuke and Sunil MendheSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : येत्या 8 ते 10 दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. भाजप उमेदवारांची दुसरी यादीही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी भंडारा-गोंदिया मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांमध्ये सरस कोण राहील, याचा आढावा भाजपने नेमलेल्या निरीक्षकांच्या माध्यमातून घेतला गेला.

भाजपच्या निरीक्षकांनी नुकताच गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांच्या नावावर ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांच्याकडून कानोसा घेतला. निरीक्षकांच्या बैठकीत उमेदवार कुणबी असावा, तेली किंवा पोवार समाजाचा असावा, या विषयावर अनेकांनी मत मांडलं. जुनाच उमेदवार द्यावा असे काहींचे मत पडले तर अधिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवार बदलण्याबाबत सूचना केली. महायुतीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ भाजपकडे राहणार असल्याचे निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत.

भंडारा-गोंदिया व गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघात गोंदिया जिल्ह्याचा भाग येत असल्याने जिल्ह्यातील उमेदवार कोण, यावर पक्षात खल सुरू आहे. मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असावा, याची चाचपणी करण्यासाठी भाजपचे लोकसभा निरीक्षक नुकतेच भंडाऱ्यात येऊन गेले. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांचा निरीक्षकांच्या चमूत समावेश होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Parinay Fuke and Sunil Mendhe
Jarange Vs Parinay Fuke : जरांगे कुणाची ‘तुतारी’ वाजवून कुणाची सुपारी घेत आहेत, महाराष्ट्राला माहिती आहे !

मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसंदर्भात दोन्ही जिल्ह्यांच्या पक्षनिरीक्षकांच्या प्रमुख पार पडलेल्या या बैठकीला 60 पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी या 60ही पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. जवळपास पाच तास ही बैठक चालली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमधून लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे पक्षाची ही एक प्रक्रिया असली तरी अंतिम निर्णय दिल्लीतच होणार आहे. भंडारा-गोंदियाची भाजपच्या तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

2019 च्या निवडणुकीत भाजपकडून भंडारा नगरपरिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. त्यावेळी जिल्ह्यातील गटतटाच्या राजकारणातून थेट दिल्लीपर्यंत तिकिटासाठी जोर लावण्यात आला होता. त्यात मेंढे यांना तिकिटाची लॉटरी लागली होती. मात्र, आता भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार सुनील मेंढे यांच्यासोबत आता माजी राज्यमंत्री परिणय फुके हेसुद्धा रेसमध्ये आहेत. त्याचे पडसाद निरीक्षकांनी घेतलेल्या वैयक्तिक भेटीत उमटले.

केवळ अर्ध्या-एक मिनिटात कोणता उमेदवार असावा, असा प्रश्न विचारण्यात आला. या वेळी प्रत्येक गटाच्या कार्यकर्त्यांनी हवे असलेले नाव सांगितल्याचे बोलले जात आहे. यात डॉ. परिणय फुके आणि सुनील मेंढे ही दोनच नावे चर्चेत असल्याची माहिती आहे. याचा अहवाल निरीक्षकामार्फत पक्षश्रेष्ठीकडे पोहोचलेला आहे. लवकरच भंडारा-गोंदिया मतदारसंघात उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार, हे निश्चित होणार आहे.

Edited By : Atul Mehere

R

Dr. Parinay Fuke and Sunil Mendhe
Sunil Mendhe : तिकीट मिळणार अन् चार लाख मतांनी जिंकणारही; सुनील मेंढेंच्या कॉन्फिडन्सचे रहस्य काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com