Sunil Mendhe : तिकीट मिळणार अन् चार लाख मतांनी जिंकणारही; सुनील मेंढेंच्या कॉन्फिडन्सचे रहस्य काय?

BJP Politics : भाजपच्या निरीक्षकांनी गुरुवारी गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांच्या नावावर ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याकडून कानोसा घेतला.
Sunil Mendhe
Sunil MendheSarkarnama
Published on
Updated on

Gondia Political News : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा भाजप पक्षाचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही. असे असले तरी भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी तिकिट आपल्यालाच मिळणार आणि चार लाखांच्या मताधिक्याने लोकसभा निवडणूक जिंकणारही, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे मेंढेंच्या या कॉन्फिडन्सचे रहस्य नेमके काय, याचीच चर्चा सुरू झाली आहे.

सुनील मेंढे (Sunil Mendhe) म्हणाले, आपल्या पक्षातही इच्छुकांची गर्दी अधिक आहे. निवडणुकीसाठी स्पर्धा झालीच पाहिजे, असे मत व्यक्त करत मेंढेंनी आपण केलेल्या कामावरून आपल्यालाच तिकिट मिळणार आहे. तसेच चार लाखाच्या फरकाने विजय मिळणार असल्याचे सांगितले. दरम्यान, भाजप निरीक्षकांनी खासदार उमेदवारांबाबत कार्यकर्त्यांची मते नोंदवून घेतल्यानंतर सुनील मेंढेंचा विश्वास वाढल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Mendhe
Eknath Shinde : आदित्य ठाकरेंच्या 'करप्ट मॅन'ला मुख्यमंत्री शिंदेंचं 'कॉमन मॅन'नं उत्तर

भाजपच्या निरीक्षकांनी गुरुवारी गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांच्या नावावर ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याकडून कानोसा घेतला. भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गोंदिया (Gondia) जिल्ह्याचा भाग येतो. त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवार कोण यावर चर्चा सुरू आहे. त्यातच गुरुवारी (दि. 29) भंडारा येथील एका हॉटेलात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असावा, याची चाचपणी करण्यासाठी भाजपचे लोकसभा निरीक्षक पोहोचले होते. यामध्ये भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांचा समावेश होता.

Sunil Mendhe
Basavraj Patil News : भाजपमध्ये दाखल होताच धाराशिवसाठी बसवराज पाटलांनी दंड थोपटले..

या दोन्ही निरीक्षकांनी लोकसभा (Loksabha) मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसंदर्भात दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुकाध्यक्ष, जिल्हा आघाडीचे अध्यक्ष, आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील कोअर कमिटी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. भाजपचे प्रमुख पदाधिकारी व वेगवेगळ्या मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. निरीक्षकांकडे गेलेल्या नावांमध्ये विद्यमान खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती आहे.

तब्बल पाच तास चाललेल्या पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत 60 पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. यंदाच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमधून लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे पक्षाची ही एक प्रक्रिया असली तरी अंतिम निर्णय दिल्लीतच होणार आहे.

भंडारा-गोंदियाची भाजपच्या तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच खासदार सुनील मेंढे यांचे प्रसारमाध्यमापुढे व्यक्त केलेले मत भुवया उंचावणारे आहे. त्यामुळे माझी मंत्री परीणय फुके यांच्यासोबत असलेल्या स्पर्धेत आपणही ताकतीने उभे आहोत, असे खासदार मेंढे सांगत तर नाहीत ना, असा प्रश्न आता उपस्थित केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sunil Mendhe
Eknath Shinde : मुख्यमंत्री होईपर्यंत वापरून घेतलं अन् नंतर...; ठाकरेंनी काय केलं ते शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com