Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी भाजपकडून अनेकांची नावे चर्चेत, पण कुणाला मिळणार उमेदवारी?

Prakash Ambedkar : भाजपपुढे असणार आंबेडकरांचं तगडे आव्हान.
Ranjeet Patil, Anup Dhotre and Prakash Ambedkar
Ranjeet Patil, Anup Dhotre and Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : अकोला जिल्ह्यात भाजपची ताकद मोठी आहे. विधानसभेच्या पाच आमदारांपैकी चार आमदार भाजपचे आहेत. तर विद्यमान खासदार संजय धोत्रे हे दोन दशकांपासून या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. मात्र आजारपणामुळे धोत्रे हे निवडणूक लढविणार नाहीत.

भाजपला हा गड अभेद्य ठेवायचा आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा या मतदारसंघात उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे आंबेडकर यांना तगडे आवाहन देण्यासाठी भाजपला अशा उमेदवाराचा शोध घेण्यासाठी मोठा कस लागणार आहे. कारण भाजपमध्ये अनेकांच्या नावाची चर्चा असून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला लोकसभेची उमेदवारी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

Ranjeet Patil, Anup Dhotre and Prakash Ambedkar
Akola Ranjit Patil : वाढदिवसाच्या दिवशी मिळाले मोठे गिफ्ट; रणजित पाटील...

लोकसभेचा बिगुल कधीही वाजू शकतो. त्यामुळे अनेक पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. तर विविध पक्षातील अनेकांकडून दावेदारी दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकांची नावेही चर्चेत आहेत. मात्र शेवटी निर्णय पक्ष श्रेष्ठीच घेणार आहेत. अकोला लोकसभेचा विचार केला तर अकोला लोकसभा मतदारसंघ हा गेल्या दोन दशकांपासून भाजपच्या ताब्यात आहे. लोकसभेच्या गेल्या चार निवडणुकांमध्ये धोत्रेंनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत आपला निर्विवाद दबदबा कायम ठेवला.

दरम्यान धोत्रेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळाले होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे दोन वर्षाच्या कार्यकाळात खासदार धोत्रेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. खासदार संजय धोत्रे गेल्या काही महिन्यांपासून आजारपणामुळे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे मतदारसंघात खासदार संजय धोत्रे हे निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजपला आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी मोठा कस लागणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढण्याचा निश्चय केल्याने आंबेडकर यांना निवडणुकीत तगडे आव्हान देण्यासाठी उमेदवार शोधावा लागणार आहे. भाजपमध्ये सध्या अनेकांची नावे चर्चेत आहेत. भाजपला संजय धोत्रेंच्या पक्ष निष्ठेचे फळ द्यायचे असल्यास खासदार धोत्रें यांचे चिरंजीव अनुप धोत्रे हे दावेदार मानले जात आहेत. मात्र अनुप धोत्रे हे प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे अतिशय नवखे उमेदवार ठरतात. असं असलं तरी जिल्हा भाजपकडून अनुप धोत्रेंना उमेदवार म्हणून पुढे केले जात आहे. मात्र अनुप धोत्रेंना उमेदवारी न मिळाल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू डॉ. रणजीत पाटील यांच्याही नावाची चर्चा जोरात होत आहे.

पाटील यांना धोत्रे गटाचा विरोध असणार आहे. मात्र भाजपकडून डॉ. पाटील यांचाही विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे. तर कुणबी समाजाचे नेते म्हणून ओळख असलेले माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे यांच्याही नावाची भाजपकडून विचार केले जाण्याची शक्यता आहे. यासह नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री अनंतराव देशमुख हेही अकोला लोकसभेसाठी चर्चेत आहेत. रिसोड-मालेगाव मतदारसंघात देशमुख यांचे वर्चस्व आहे. हा मतदारसंघ अकोला लोकसभेत येतो. त्यामुळे यांच्याही नावाची चर्चा आहे. यासह अनेक जण इच्छुक आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान ॲड. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाल्याने भाजपला आंबेडकर यांना तगडे आवाहन देण्यासाठी उमेदवार शोधावा लागणार आहे. तर दुसरीकडे वंचितचा सहभाग इंडिया आघाडीत झाल्यास भाजपला ही जागा टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळेच नव्या उमेदवाराचा शोध घेताना भाजपकडून कोणती रणनीती ठरते. अन् कोण भाजपचा अकोला लोकसभेचा उमेदवार ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com