Mahadev Jankar News : 'OBC आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास...' ; महादेव जानकरांचा इशारा!

OBC Reservation and Mahadev Jankar News : 'बारामती ही माझी युद्धभूमी आहे, धनगरांची मतं...' असंही जानकर यांनी म्हटलं आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Yavatma Political News : ओबीसी प्रवर्गात 345 जाती आहेत. मात्र, काहीजण ओबीसीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे झाल्यास ओबीसी प्रवर्गातील गरीब-कष्टकऱ्यांवर अन्याय होईल, अशा स्थितीत सरकारनेच ओबीसी संरक्षणाची काळजी घ्यायला हवी, असे प्रतिपादन रासपचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.

तसेच, या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. एवढेच नव्हेतर राज्यातील 22 जिल्ह्यात धनगर समाजाचे प्राबल्य असल्याचेही ते यावेळी सांगण्यास विसरले नाहीत.

राज्यातील 22 मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे राजकीय आखाड्यातही धनगर समाजाला कमी लेखू नका, असे ते म्हणाले. रासपने मागील निवडणुकीत भाजपाला मदत केली. मात्र, गरज संपल्यानंतर भाजपाने रासपसारख्या छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत आम्ही येणाऱ्या निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar
Lok Sabha Election 2024 : गिरीश महाजनांचं ठाकरेंना थेट चॅलेंज; म्हणाले, 'लोकसभेची एक तरी जागा...'

भाजपासोबत असताना रासपचे राज्यात 23 नगरसेवक होते. आज ही संख्या 98 वर गेली असून, जिल्हा परिषद सदस्यांमध्येही चौपट वाढ झाल्याचे, माजीमंत्री जानकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील 72 हजार पोलिंग बूथवर रासपचे कार्यकर्ते सक्रिय असल्याचे ते म्हणाले. भाजपा आणि काँग्रेस हे मोठे पक्ष लहान घटकांना निवडणुकीत वापरुन घेतात, असा आरोपही जानकर यांनी यावेळी केला.

बारामती ही माझी युद्धभूमी आहे. बारामती मतदारसंघातील जनतेच्या मनात महादेव जानकर असल्याचे सांगत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत येथे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र, ज्यांच्या पारड्यात धनगर समाजाची मते जातील तोच निवडून येईल, असेही जानकर म्हणाले.

Mahadev Jankar
Vanchit Bahujan Aghadi : ‘त्या’बाबत मात्र मोदी खरे बोलले, आंबेडकर असे का म्हणाले?

शासनाने समाजातील वंचित घटकांना पुढे आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. शिक्षण आज केवळ श्रीमंताचे झाले आहे, अशा स्थितीत कष्टकरी वर्ग शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, त्यासाठीच सर्वांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. वयाच्या 55 वर्षानंतर शासनाने सर्वांना मोफत आरोग्य सेवाही पुरविली पाहिजे, याच बरोबर युवकांच्या हातांना काम देण्यासाठी बीज भांडवल उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

...त्यांनी पक्ष फोडले अन्‌ घरही फोडले !

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘राज्यातील छोटे छोटे पक्ष संपवा,’ असे विधान केले आहे, त्याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, ‘‘भाजपाने मागील वर्षी शिवसेना पक्ष फोडला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षही फोडला. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी राष्ट्रवादीचा परिवारही फोडला आहे. आता काँग्रेस पक्ष फोडत आहेत. त्यामुळे त्यांना आता लोकशाही नको आहे.’’

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com