Devendra Fadnavis : देशमुखांवरील हल्लाप्रकरण सलीम-जावेदची स्टोरी, तर पटोले-सुळेंवरील आरोप गंभीर; मतदान करताच फडणवीसांची टोलेबाजी ...पाहा VIDEO

Devendra Fadnavis React on Nana Patole Supriya Sule Bitcoin Case : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हल्ल्यावर मोठी प्रतिक्रिया दिली.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हल्लाप्रकरण जोरदार टोलेबाजी केली.

तसेच बिटकॉइन संदर्भात नाना पटोले आणि सुप्रिया सुळेंची व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी होऊन, त्यातील सत्य बाहेर येणे, हा जनतेचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील (Anil Deshmukh) हल्लाप्रकरणी हे बोगस आहे. एसपी आणि आयजीने पत्रकार परिषद घेतली, त्यातील घटनाक्रम, व्हिडिओ क्लिप पाहिल्या आहेत. हा प्रकार म्हणजे, सलीम-जावेदची स्टोरी होती, रजनीकांतसारखा मागून येऊन गोटा समोर लागला होता. त्याच्यामध्ये काय घडलं आहे, ते सर्वांना समजलं आहे".

Devendra Fadnavis
Nagpur Assembly Election : नागपूरमधील 'त्या' 2 मतदारसंघात भाजपचा पराभव? कैलाश विजयवर्गीय यांना 10 जागांवर विजयाची खात्री

बिटकॉइन संदर्भात नाना पटोले-सुप्रिया सुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपवर फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "हा आरोप गंभीर आहे. योग्य तपासणी झाली पाहिजे. काय खरं आहे, ते सर्वांसमोर आलं पाहिजे. आरोप गंभीर असल्याने आरोपांची चौकशी होऊन, त्यातले सत्य बाहेर येणे, हा जनतेचा अधिकार आहे".

Devendra Fadnavis
Sachin Pilot : पोचायचं होतं गोंदियाला, पोचले गडचिरोलीला; सचिन पायलट यांच्याबरोबर काय घडला 'किस्सा'

तावडे आणि सुळे-पटोले प्रकरणाचे 'टायमिंग'

विनोद तावडे यांचे पैसा वाटप प्रकरण आणि सुप्रिया सुळे-नाना पटोले बिटकॉइन संदर्भातील आरोप यांचे टायमिंग एकच असे झाले, त्यावर फडणवीस यांनी वेळ मारून नेणारी प्रतिक्रिया दिली. "विनोद तावडे यांनी कोणताच पैसा वाटलेला नाही. त्यांना जाणिवपूर्वक गुंतवले जात आहे. आरोप केले जात आहे. परंतु सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर माजी आयपीएस अधिकारी यांनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिप या गंभीर आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे", अशी प्रतिक्रिया दिली.

मतदान करण्याचे आवाहन

मतदानाचा टक्का वाढेल, असे सांगताच, मतदान जो करतो, त्याला अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मतदान करा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकसभा मतदानावेळी जो घोळ झाला, तो यावेळी काहीप्रमाणात कमी झाल्याचे निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com