Maharashtra Assembly Winter Session 2023 : हे सरकार खरंच शेतकऱ्यांचं? 10 महिन्यांत तब्बल 'इतक्या' शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

Nagpur Assembly Winter Session 2023 Farmers Death Issue : अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला सरकारच्या मदतीची आस...
Eknath Shinde, Farmers Death Issue
Eknath Shinde, Farmers Death IssueSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session 2023 : सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी अशी सतत बतावणी करत असताना 10 महिन्यांत तब्बल 2, 366 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती आज विधिमंडळात दिली.

यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत राज्यातील 2 हजार 366 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील 57 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा केल्याचा दावा गेल्याच आठवड्यात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता. तर सरकार शेतकऱ्यांचे आहे, असा दावा वारंवार सरकारकडून केला जातो. तर मग शेतकऱ्यांच्या का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Eknath Shinde, Farmers Death Issue
Old Pension Scheme : मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश; जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे

आम्ही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली आहे. केंद्राने ठरवून दिलेल्या पेक्षा जास्त मदत करत आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात सभागृहात सांगितले होते. शिवाय केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे. तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, म्हणजे सरकारचे धोरणे शेतकरीपुरक नाहीत हे स्पष्ट होते, अशी चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात कुठे, किती आत्महत्या?

राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अमरावती विभागात झाल्या. अमरावती विभागात 951, मराठवाडा विभागात 877, नाशिक विभागात 254, नागपूर विभागात 257, पुणे विभागात 27, लातूर जिल्ह्यात 64 आणि धुळे जिल्ह्यात 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान एकूण 2478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विधिमंडळात लेखी उत्तरात राज्य सरकारने ही माहिती दिली आहे.

Eknath Shinde, Farmers Death Issue
Assembly Winter Session 2023 : लातूरमधील 28 मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा रक्कमेची प्रतीक्षा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com