Assembly Winter Session 2023 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून नागपुरात सुरवात होत आहे. या अधिवेशनात नऊ विधेयके मांडली जाणार आहेत. ही विधेयके कोणती याची उत्सुकता आहे. मराठा, धनगर, आदिवासी आरक्षण प्रश्न, ललित पाटील प्रकरण, आरोग्य विभाग घोटाळा आणि अवकाळी नुकसानभरपाई वरून विरोधक आक्रमक होत सरकारला धारेवर धरणार आहेत. (Latest Marathi News)
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरवात होत आहे, आज पहिल्या दिवशी विधानभवनाकडे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे विधान भवन परिसराला पोलिस छावणीचे रूप आले आहे.
आज पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहिली जाणार आहे. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात 9 विविध विधेयके मांडली जाणार आहेत. ही विधेयके कोणती याची उत्सुकता आहे. मराठा, धनगर, मुस्लिम, आदिवासी आरक्षण मागणीच्या मुद्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत.
ललित पाटील प्रकरणात सरकारच्या मंत्र्यांचा समावेश असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्याने या मुद्यावरून देखील विरोधक आक्रमक होऊ शकतात. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. तर दुसरीकडे दुष्काळ उपाय योजनेबाबत सरकार अपयशी ठरल्याचे विरोधक बोलत आहे, त्यामुळे हा मुद्दा देखील सरकारची अडचण करू शकतो.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.