Maratha Reservation : आरक्षण मिळेना, मराठ्यांच्या मुलांची लग्नं होईना; राष्ट्रवादीच्या आमदाराने 'असा' जोडला संबंध!

Maharashtra Assembly Winter Session Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणावर नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जोरदार चर्चा झाली...
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation In Maharashtra Latest News : नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चा झाली. यात मराठा समाजाच्या मुलांची लग्नं जमत नाही. आरक्षण नसल्यामुळे अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम समाजावर होत असल्याची भावना राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मांडली.

आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मराठा आरक्षण आणि त्याचा मुलांच्या लग्नाशी जोडलेला संबंध सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार तनपुरे यांनी हा मुद्दा थेट आरक्षणाशी जोडल्याने तो खरंच गांभीर आहे का? तज्ज्ञांमध्ये यावर विश्लेषण सुरू झाले आहे.

Maratha Reservation
Martha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदाराने मध्यरात्री केली 'या' नेत्याची कानउघडणी!

आमदार तनपुरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करताना मराठा समाज पारंपरिक पद्धतीने करत असलेल्या शेती व्यवसायाकडे लक्ष वेधले. आज शेती व्यवसायाची अवस्था बिकट आहे. शेत मालाला भाव मिळत नाही. दुष्काळ पडतो. सरकारकडून मदत मिळत नाही. कांद्याचे भाव वाढले, तर निर्यातबंदी झाली. आणि कांद्याचे भाव पडले. दुधाचे भाव पडले. कुठेतरी शेतकऱ्यांना चार पैसे शेतीत मिळत असतानाच भाव पडतात. सरकार देखील शेतकऱ्याला भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील नाही. शेती तोट्याचा धंदा झाल्याकडे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय निसर्गाची अवकृपा होते. सुलतानी संकट येते. मागून देखील दिवसा वीज मिळत नाही. बिबटे, साप असताना शेत पिकाला पाणी देण्यासाठी रात्री जावे लागते. यातून उत्पन्न घटते. पोटाचा विचार येतो. नोकरीची परिस्थिती राहिली नाही. बेरोजगारी या देशात कधी नव्हे ती वाढली आहे. यातून मराठा समाजातील मुलांची लग्नं होत नाहीये. कित्येक उदाहरणं अशी आहेत की, 30 वर्षे वयाचे उलटून जातात. परंतु मुली भेटत नाही. अशा सर्व परिस्थितीत मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय. आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी मिळेल. चांगल्या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश मिळेल, या भावनेतून मराठा समाज आरक्षण मागत असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.

Maratha Reservation
Nagpur Winter session: चव्हाण PMO कार्यालयाचे मंत्री असताना आरक्षण का मिळाले नाही? जयकुमार गोरे कडाडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com