Martha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदाराने मध्यरात्री केली 'या' नेत्याची कानउघडणी!

Samadhan Autade : मी माझ्या समाजाच्या व्यथा सांगतोय, म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना ही सुनावले
Samadhan Autade, vijay wadettiwar
Samadhan Autade, vijay wadettiwar sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून काही नेत्यांकडून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे केली जात असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत. हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद पाहायला मिळाले. याच मुद्द्यावरून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सभागृहात आपले मत व्यक्त करताना नेत्यांची कान उघडणी केली आहे.

Samadhan Autade, vijay wadettiwar
Modi Government : ...पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्लीश्वरांकडे वेळ नाही!

हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर सलग तीन दिवसांपासून चर्चा करण्यात येत आहेत. गुरुवारी रात्री दीड वाजेपर्यंत मराठा आरक्षणाची ही चर्चा सुरू राहिली.पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी गुरुवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास मराठा आरक्षणावर आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळाली. यावेळी बोलताना आवताडे यांनी मराठा आरक्षणावर सभागृहातील काही सदस्यांनी केलेल्या भाषणांवर नाराजी व्यक्त करत त्यांची चांगलीच कानउघडणी केली.

स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेली. याच सभागृहात अनेक सदस्य आहेत ज्यांनी या सभागृहात महत्वाची पदे उपभोगली आहेत. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता होती. तरीही मराठा समाजाला आजपर्यंत आरक्षण मिळाले नाही, ही खेदाची बाब आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून समाजामध्ये दरी निर्माण झाली आहे. जाती-जातीवरून तरुण पिढीमध्ये वाद निर्माण होत आहेत. ते वाद..ती जातीय दरी न वाढता एकोपा वाढावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, या सभागृहात अनेकांची भाषणे ऐकत असताना प्रत्येक सदस्य म्हणत होते की मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. यात काय राजकारण नको. मात्र काही ज्येष्ठ सदस्यांच्या भाषणाला राजकारणाचा गंध येतोय, असे आवताडे म्हणाले.

Samadhan Autade, vijay wadettiwar
Lok Sabha Election : गडकरी, फडणवीस अन् 'आरएसएस'च्या बालेकिल्ल्यातून काँग्रेस लोकसभेचा शंखनाद करणार

मराठा आरक्षणाच्या या चर्चेवर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी भाषण करताना 'मी माझ्या समाजाच्या व्यथा सांगतोय"असे वाक्य वापरले होते. या वाक्याकडे लक्ष वेधत आवताडे म्हणाले, विरोधी पक्ष नेते हे संविधानिक पद आहे. आज विरोधी पक्षानेत्यांची भूमिका सर्व समाजासाठी सारखीच असालयाला हवी. विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी सरकार जिथे चुकते तिथे विरोध करण्याची भूमिका घ्यायला हवी. मात्र त्यांनी माझा समाज, त्यांचा समाज अशी भूमिका मांडणे योग्य नाही. परंतु आज समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम या ठिकाणी चालू झाले असल्याची खंत आमदार आवताडे यांनी वडेट्टीवार आणि इतर काही सदस्यांच्या भाषणावर व्यक्त केली.

मराठा आंदोलकांचे एकचं म्हणण आहे. आरक्षण हे शिक्षणसाठी पाहिजे. नोकरीसाठी पाहिजे. मराठा समाजाला राजकारणासाठी आरक्षण नकोय. मराठा समाज हा शेतीवरच अंवलबुन आहे. यापूर्वी मराठा समाजाकडे शेती होती. मात्र आता कुटुंबाचे विभाजन झाल्यामुळे मराठा समाज आता अल्पभूधारक झाला आहे. त्यामुळे मराठा समाज आता आर्थिकदृष्ट्या मागास झाला आहे. समाजातील गरीबी वाढत चालली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, असे आवताडे म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण यापूर्वीच मिळायला पाहिजे होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना जीआर काढून एका दिवसात आरक्षण देण्याचे काम केले. मात्र त्यांनी दिलेले आरक्षण टिकलं नाही. मराठ्यांना खरं आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले. त्यांनी ते आरक्षणात उच्च न्यायालयात टिकवले. मात्र महाविकास आघाडीला ते आरक्षण टिकवता आले नाही. पंरतु आता या सरकारकडून मराठा समाजाला 100% आरक्षण मिळणार आहे. ते ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, फडणवीस आणि अजित पवार हे मराठा समाजाला आरक्षण नक्कीच देतील असा विश्वासही आमदार आवताडेंनी यावेळी व्यक्त केला.

(Edited by Roshan More)

Samadhan Autade, vijay wadettiwar
Balasaheb Patil News : सरकार सायबर सेलवर विशेष लक्ष ठेवू शकेल का ? बाळासाहेब पाटील यांचा सवाल..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com