Assembly Winter Session : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे; आमदार धंगेकरांकडून थेट मुख्यमंत्रीच टार्गेट

Maharashtra Assembly Winter Session Ravindra Dhangekar For Ganesh Mandal workers : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक...
CM Eknath Shinde, Ravindra Dhangekar
CM Eknath Shinde, Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session 2023 : गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव अधिक चांगल्या प्रकारे साजरा करता यावा यासाठी राज्य सरकारने सर्व निर्बंध हटविले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्बंधमुक्त उत्सव साजरी करण्याचे आवाहन देखील केले होते. असे चित्र एका बाजुला असताना दुसरीकडे या दोन्ही उत्सवांच्या काळात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी वेगवेगळी कलमे लावून अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत.

पोलीस खात्याची ही कारवाई अन्यायकारक आहे. यामुळे हजारो तरुणांचे भवितव्य अंधारात सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. उत्सवाच्या काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी शुक्रवारी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्यात आले. कसबा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी याबाबत आवाज उठविला.

CM Eknath Shinde, Ravindra Dhangekar
Nagpur Winter Session : सत्ताधाऱ्यांकडून बेरोजगारांची थट्टा...! विरोधकांकडून पकोडे तळून निषेध

नागपुरात सुरू असलेले हिवाळी अधिवेशन रोज वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेतीमालाला मिळणारा कमी भाव, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, पाणीटंचाई, कांदा निर्यात, या विषयांवर अधिवेशनात जोरदार चर्चा रंगत आहेत. विविध प्रश्नांवरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील आमदार एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत तुटून पडत असल्याचे अधिवेशनात पाहायला मिळत आहे.

हिवाळी अधिवेशना दरम्यान शुक्रवारी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन केले. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, याकडे त्यांनी हातात फलक घेत सरकारचे लक्ष वेधून घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'गणेशोत्सव, दहीहंडी या उत्सवावरील निर्बंध आम्ही हटवले असून निर्बंधमुक्त वातावरणात हे सण साजरे करा, असे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. उत्सवकाळात पाच दिवस रात्री उशिरापर्यंत स्पीकर लावण्याची परवानगी देखील सरकारने दिली होती. असे असताना दुसरीकडे मंडळांच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळी कलमे लावून पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पूर्णतः चुकीची आहे', असे आमदार धंगेकर म्हणाले.

गुन्हे दखल करण्यात आलेल्यांमध्ये अनेक तरुण आहेत. त्यांच्यावर गुन्हे दखल केले तर त्यांना नोकरी मिळणार नाही. उच्च शिक्षणात त्यांना अडचणी येतील. अनेक तरुण बेरोजगार असून त्यांना कामधंद्यासाठी पुरेशी मदत देखील मिळत नाही. सरकारने जाहीर केलेल्या नियमांच्या अधीन राहून तरुणाईने उत्सव साजरा केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घेऊन संवेदनशील राहावे, असे आवाहन आमदार धंगेकर यांनी केले आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com