Nagpur Winter Session : सत्ताधाऱ्यांकडून बेरोजगारांची थट्टा...! विरोधकांकडून पकोडे तळून निषेध

Opposition Protest At Winter Session : पकोडे तळत रोहित पवार अन् सतेज पाटलांचे विधानभवन परिसरात आंदोलन
Rohit Pawar Nagpur winter Session
Rohit Pawar Nagpur winter Session Sarkarnama
Published on
Updated on

नागपूर : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा जोरदार निषेध केला. सत्ताधाऱ्यांनी बेरोजगारांची थट्टा केली आहे, असा आरोप करत विधानभवन परिसरात पकोडे तळले. यावेळी सत्ताधाऱ्यांविरुद्ध विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

"पेपरफुटी झाली, काय दिवे लावले",

"भरतीची घोषणा, काय दिवे लावले",

"बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले",

"पी.एचडीधारकांची थट्टा, काय दिवे लावले",

अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पी.एचडी करून काय दिवे लावणार, असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यांचे वाक्य बरेच ट्रोल झाले. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच माझ्या बाजूने हा विषय संपल्याचे जाहीर केले आहे. मात्र, विरोधकांनी त्यांच्या 'काय दिवे लावले', या वाक्याला धरून शुक्रवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रवींद्र धंगेकर, सचिन अहिर, सतेज पाटील, रोहित पवार, के. सी. पाडवी यांनी आंदोलनात सहभाग घेतला. सर्वच परीक्षांमध्ये पेपरफुटी वाढली आहे. सरकार यावर कुठलीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. मोदींची गॅरंटी म्हणून सरकारचे मंत्री सांगताहेत, तशी गॅरंटी बेरोजगारी हटविण्यासाठी देणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. सरकार बेरोजगारीच्या मुद्द्यावर गंभीर नाही. रोजगार देण्याऐवजी पकोडे तळण्याचा सल्ला सरकार देत आहे. त्यामुळे पकोडे तळून सरकारचा निषेध करण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले.

Rohit Pawar Nagpur winter Session
Nagpur Winter Session : बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; राणेंनी विधानसभेत झळकावला फोटो

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com