Ajit Pawar: संपूर्ण राष्ट्रवादीच झाली भाजपमय! एकनाथ शिंदेंनंतर आता अजित पवारही शाहांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार का?

NCP Defection at Amaravati: कल्याण-डोंबिवलीत पक्षांतरामुळं शिवसेनेला मोठं डॅमेज होणार असल्यानं एकनाथ शिंदे हे थेट दिल्लीत अमित शहांच्या भेटीसाठी गेले आहेत. अजित पवारांवरही आता ती वेळ येणार अशी चिन्ह आहेत.
Ajit Pawar, Amit Shah, Eknath Shinde
Ajit Pawar, Amit Shah, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

-- नारायण येवले

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते यांनी भाजपत प्रवेश केला. या पक्षांतरामुळं शिवसेनेला मोठं डॅमेज होणार असल्यानं शिवसेनेत मोठी नाराजी पसरली आहे. येत्या काळात हा प्रकार थांबवावा यासाठी एकनाथ शिंदे हे थेट दिल्लीत अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. याच प्रमाणं आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट घेण्याची वेळ येतेय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अमरावती जिल्ह्यात अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही भाजपत दाखल झाल्याचं चित्र आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या पक्षांतराचा फटका राष्ट्रवादीलाही बसण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar, Amit Shah, Eknath Shinde
Eknath Shinde: पक्षांतरावरुन शिवसेनेत प्रचंड नाराजी! एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; थेट अमित शहांसोबत करणार चर्चा

नेमकं काय घडलंय?

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा इथले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके यांच्या गटातील सर्वच नगरसेवक व पदाधिकारी भाजपात सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडं भाजपाचा एक नगरसेवक व एक माजी उपसभापती काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. यामुळं विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Ajit Pawar, Amit Shah, Eknath Shinde
All India Forward Bloc Symbol Sangamner : काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचा पंजा गायब, आमदार तांबे 'सिंह'च्या चालीत!

पंधरा वर्षे राष्ट्रवादीची सत्ता

चिखलदरा ही ‘क’ दर्जाची नगरपालिका असून याठिकाणची लोकसंख्या फारच कमी आहे. पाच हजारांची लोकसंख्या असलेल्या या नगरपरिषदेत केवळ ३,३०० मतदार आहेत. चिखलदरा हे पर्यटनस्थळ असल्यामुळं याठिकाणी १९४८ साली नगरपालिका स्थापन करण्यात आली होती. चिखलदरा नगरपालिकेचा इतिहास बघितला तर ही नगरपालिका जास्त काळ काँग्रेसच्या ताब्यात होती, तर एक वेळा भाजपानं यावर ताबा मिळवला होता. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या ताब्यात ही नगरपरिषद आली व तब्बल १५ वर्षे त्यांचे राज्य राहिले. परंतु यंदाच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडीनं चिखलदऱ्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी दिली आहे.

Ajit Pawar, Amit Shah, Eknath Shinde
Mumbai BMC elections : शरद पवार गेम फिरवणार? ठाकरे बंधूंच्या वाटाघाटी सुरू असतानाच मिळाले संकेत...

भाजप-काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात

राष्ट्रवादीचे सर्वच नगरसेवक व पदाधिकारी भाजपात दाखल झाले असून भाजपाचे एक नगरसेवक व एक माजी उपसभापती काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दरम्यान, भाजपानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांना प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवारी देऊन रिंगणात उतरविलं आहे. त्यामुळं प्रभाग क्रमांक दहाची निवडणूक सुद्धा प्रतिष्ठेची होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com