Eknath Shinde: पक्षांतरावरुन शिवसेनेत प्रचंड नाराजी! एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; थेट अमित शहांसोबत करणार चर्चा

Eknath Shinde: तळागळातल्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांची जिथं संधी मिळेल तिथं घुसण्याची धडपड सुरु असून मोठ्या प्रमाणावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षांमध्ये उड्या मारताना दिसत आहेत.
Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi
Eknath Shinde, Amit Shah, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरु आहे. स्थानिक पातळीवर निवडणुका असल्यानं त्या तळागळातल्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या मानल्या जातात. या निवडणुकांमध्ये कोणीही कोणाशीही युती-आघाडी करु शकतो, त्यावर पक्ष श्रेष्ठींकडून शक्यतो निर्बंध घातले जात नाहीत. त्यामुळं स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रीय होण्यासाठी बऱ्याचदा पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिथं संधी मिळेल तिथं घुसण्याची धडपड सुरु असते. त्यामुळेच सध्या कार्यकर्त्यांच्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षांमध्ये उड्या मारताना दिसत आहेत. त्यानुसार कल्याण-डोंबिवली हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदेंच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.

यामुळं स्थानिक स्तरावर पक्ष कमकुवत झाल्यानं शिवसेनेत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. हा प्रकार थांबवा यासाठी एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. या ठिकाणी ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या भेटीमध्ये काहीतरी तोडगा निघेल किंवा महत्वाची घडामोड घडू शकते, अशीही चर्चा सुरु आहे.

Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi
Aadhaar Card : केंद्राचे मोठे पाऊल! आधारकार्डमध्ये मोठा बदल! ना नाव असेल ना पत्ता, फक्त असेल फोटोसोबत अन्...

शिवसेनेत प्रचंड नाराजी

कल्याण-डोंबिवलीतील या मोठ्या प्रमाणावरील पक्षांतराच्या घटनेनंतर शिवसेनेमध्ये नाराजी पसरली असून काल पार पडलेल्या राज्याच्या कॅबिनेट बैठकीतही शिवसेनेच्या आमदारांनी हजेरी लावली नव्हती. प्री कॅबिनेटच्या शिवसेनेच्या बैठकीत बहिष्कार घालण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळंच केवळ नावाला म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटच्या बैठकीला हजेरी लावली तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीकडं पाठ फिरवली. या नाराजीबाबत माध्यमांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा चांगलाच पिच्छा पुरवला पण महायुतीत कुठलीही नाराजी नसल्याचं शिवसेनेचे नेते मंडळी सांगत होते. पण आज यावर आता शिक्कामोर्तब झालं असून एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत, ते केवळ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठीच, असं सुत्रांकडून कळतं आहे.

Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi
Rohini Yadav Net Worth : लालूंची कन्या रोहिणी आचार्य 'सुपर रिच'! 'नेट वर्थ' तेजस्वीपेक्षा 4 पटीनं जास्त, पतीही बक्कळ श्रीमंत

अमित शहांची घेणार भेट

दरम्यान, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे हे अमित शहा यांची भेट घेऊन आपला बालेकिल्ला असेलल्या कल्याण-डोंबिवलीसह इतर भागात ज्या प्रकारे भाजपनं शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडले आहेत ते अत्यंत चुकीचं असून यामुळं शिवसेना या भागात मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं हे प्रकार तातडीनं थांबवायला हवेत अशी विनंतीच ते अमित शहांकडे करणार असल्याचं कळतं आहे. त्यामुळं त्यांच्या संभाव्य भेटीत काय तोडगा निघतो किंवा आणखी काही महत्वाच्या घडामोडी घडतात का? यावर लक्ष ठेवावं लागणार आहे.

Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi
Ajit Pawar : कोकणात मतदानाआधीच राष्ट्रवादीने उधळला विजयी गुलाल! पेण नगर पालिकेत अजितदादांचा उमेदवार बिनविरोध

उद्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

तसंच उद्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधीसोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला भाजपशासित राज्यांतील सर्व मुख्यमंत्री आणि इतर महत्वाचे मंत्री हजेरी लावणार आहेत. त्यामुळं राज्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील बिहारला शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत. पण तत्पुर्वीच एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची आज भेट घेऊन राज्यातील पक्षांतराचा विषय मार्गी लावण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com