Gadchiroli Lok Sabha Election 2024: गडचिरोलीत मतदानात घातपाताचा धोका ? राज्य सरकार अलर्ट

Maharashtra Lok Sabha Election 2024: गडचिरोली हा विभाग माओवादीदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. या मतदारसंघातील ४२८ मतदान केंद्रे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे पोलिसांचे या मतदारसंघात विशेष लक्ष आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Mumbai: लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) मोकळ्या वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदारसंघात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस यंत्रणा वेगाने काम करीत आहे. विदर्भातील गडचिरोली मतदारसंघ (Gadchiroli Chimur Loksabha Election 2024) हा नक्षलवाद्यांच्या रडारवर असतो, त्यामुळे या ठिकाणी यंत्रणा अधिक अलर्ट झाली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघांत निवडणुका होत आहेत. गडचिरोली-चिमूर मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. गडचिरोली हा विभाग माओवादीदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. या मतदारसंघातील ४२८ मतदान केंद्रे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे पोलिसांचे या मतदारसंघात विशेष लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
MP Hemant Godse: शिवसेना ठाकरे गटानेही केले हेमंत गोडसे यांच्यासाठी दरवाजे बंद

निवडणुकीच्या काळात गडचिरोली मतदारसंघात नक्षलवाद्यांकडून घातपात घडवून आणला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मतदानाच्या आधी व नंतर पाच दिवस हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मतदानाच्या दरम्यान माओवाद्यांकडून गडचिरोली मतदारसंघात घातपात होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी घातपात झाल्यास संभाव्य जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासन यंत्रणेकडून पाहणी सुरू आहे.

मतदानाच्या आधी दोन दिवस व मतदानानंतर दोन दिवस हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर पुरवठा कंपनीच्या यादीतील कंपनीकडून हवाई रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गृह विभागाने सोमवारी त्यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

गडचिरोली हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या अतिशय विस्तीर्ण असून, हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (एसटी) उमेदवारासाठी राखीव आहे. आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी असे तीन तसेच चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी, चिमूर व गोंदियातील आमगाव अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचे मिळून गडचिरोली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. चंद्रपूरमधून गडचिरोली विभक्त होऊन स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर २००९ मध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला.

Edited by: Mangesh Mahale)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com