MP Hemant Godse: शिवसेना ठाकरे गटानेही केले हेमंत गोडसे यांच्यासाठी दरवाजे बंद

Nashik Lok Sabha Constituency Election 2024: गद्दारांना प्रवेश नाही, या शब्दांत शिवसेनेच्या नेत्यांनी गोडसे समर्थकांना झुरळ झटकावे तसे दूर केले. त्यामुळे कालपर्यंत त्वेषाने लढण्याची भाषा करणारे गोडसे समर्थक यांच्यापुढे आता सर्व मार्ग बंद झाल्यासारखी स्थिती आहे.
Hemant Godse
Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Loksabha 2024 News: बंडखोरीचा धोंडा पायावर पाडून घेतलेल्या खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांची सगळीकडून कोंडी झाली आहे. महायुतीने त्यांना उमेदवारी (Nashik Lok Sabha Constituency Election 2024) नाकारली आहे. दुसरीकडे अन्य पक्षांनीही त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे खासदार गोडसे यांच्यापुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार गोडसे यांची उमेदवारी अनिश्चित आहे. पक्षनेत्यांकडून स्पष्ट संकेत मिळत नाही. त्यामुळे गोडसे यांचे समर्थक कोंडीत सापडले आहेत. काल सकाळी गोडसे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे चाचपणी करून पाहिली. त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याशी संपर्क केला.

मात्र दोन्ही ठिकाणाहून त्यांची निराशा झाली. गद्दारांना प्रवेश नाही. या शब्दात शिवसेनेच्या नेत्यांनी गोडसे समर्थकांना झुरळ झटकावे तसे दूर केले. त्यामुळे कालपर्यंत त्वेषाने लढण्याची भाषा करणारे गोडसे समर्थक यांच्यापुढे आता सर्व मार्ग बंद झाल्यासारखी स्थिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी काल शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार मेळाव्यात गौप्यस्फोट केला. बडगुजर म्हणाले, "खासदार गोडसे यांचे निकटवर्तीय आबा बोराडे आपल्या काही सहकाऱ्यांसह माझ्याकडे आले होते. त्यांनी जे झाले ते विसरून आम्हाला पदरात घ्यावे, अशी विनंती केली होती.

मात्र गद्दारांना शिवसेनेची दारे बंद झाली आहेत, असे स्पष्ट निर्देश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहेत. त्यामुळे आम्ही गोडसे यांनी आता शांतपणे बसावे. राजकारण बाजूला ठेवून समाज व देशाच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार वाजे यांच्या पाठीशी उभे राहावे, अशा सूचना केल्या आहेत,"

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हेमंत गोडसे यांना दहा वर्षे खासदार केले. त्यांच्यासाठी जिवाचे रान करून प्रचार केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठ्या विश्वासाने अन्य इच्छुकांना बाजूला ठेवून गोडसे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, गोडसे हे उपकार विसरून ज्यांच्या भरवशावर शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात गेले.

त्यांची काय अवस्था झाली आहे. हे सर्व कार्यकर्ते पाहत आहेत. ही अवस्था पाहून फार खेद वाटतो. जे लोक काही हेतू ठेवून काम करतात, त्यांच्या पदरात नेहमी निराशाच पडते. मात्र, चांगल्या हेतूने काम करणाऱ्यांच्या पदरात नियमित यश येते, असा दावा बडगुजर यांनी केला.

Hemant Godse
Kokan Politics: कोकणात नवा ट्विस्ट; किरण सामंतांची माघार; महायुतीकडून नारायण राणेंचे नाव फायनल?

हेमंत गोडसे यांनी काल शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्याला उमेदवारीसाठी विचारणा केल्याचा दावा केला आहे. या सर्व घडामोडींमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळाची स्थिती आहे. उमेदवारीचा हा अहवाल केव्हा निकाली निघेल, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com