Maharashtra-Madhya Pradesh : महाराष्ट्र-मध्यप्रदेशला जोडणाऱ्या रस्त्यासाठी गडकरींनी दिले ‘हे’ आश्‍वासन !

Nitin Gadkari :नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात बोलताना, या रस्त्याच्या निकृष्ट कामाची कबुली दिली होती.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

देशात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते बनवले. अनेक ठिकाणी रस्त्याचे विक्रमही केले. रस्ते बांधकामाच्या धडाक्यामुळे संपूर्ण देश त्यांना रोडकरी म्हणून ओळखतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अकोला- अकोट महामार्गाचे काम पूर्ण करतील का, असा प्रश्न गेल्या नऊ वर्षांपासून या रस्त्याने प्रवास करणारी जनता विचारत आहे.

मध्यप्रदेशला जोडल्या जाणाऱ्या अकोला-अकोट राज्य महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. अखेर गडकरींनी या महामार्गाची दखल घेतल्यानंतर आता तरी हा महामार्ग पूर्ण होईल, अशी आशा जनता लावून बसली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रस्त्याच्या लोकार्पणासाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात बोलताना, या रस्त्याच्या निकृष्ट कामाची कबुली दिली होती.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी सांगितला फंडा !

निकृष्ट दर्जामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असल्याचे गडकरी म्हणाले होते. तर प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या रस्त्यावरील खराब झालेला भाग उखडून फेकत हा रस्ता चार महिन्यांत पूर्णतः चांगला केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यामुळे तेव्हापासून या रस्त्याचे काम कधी पूर्णत्वास जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यातील दळणवळण या दृष्टीने अकोट ते अकोला हा महामार्ग विकासाचा मार्ग आहे. हा रस्ता थेट मध्यप्रदेश राज्याला जोडला जाणारा अतिशय महत्वाचा मार्ग आहे. मात्र ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने हे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांकडून वारंवार विचारला जाऊ लागला आहे.

अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील 75 किलोमीटरचा रस्ता अवघ्या पाच दिवसांत पूर्ण झाल्यानंतर या कामाची गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली. मात्र अकोला- अकोट महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याने याचाही रेकॉर्ड होणार का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. तर याबाबत अनेक व्हिडिओही यापूर्वी व्हायरल झाले आहेत. या रस्त्याची गिनीस बुक मध्ये नोंद करून अकोला जिल्ह्याचा लौकिक वाढवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोला-अकोट हा अवघा 50 किलोमीटरचा मार्ग नऊ वर्षांनंतरही बांधून पूर्ण करता आलेला नाही. निवेदने, आंदोलने करूनही प्रश्न न सुटल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. या रस्त्याचे जे काम झाले तेही निकृष्ट दर्जाचे झाले, याची कबुली खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अकोला जिल्ह्यात येऊन दिली होती. त्यानंतर आपण यामध्ये लक्ष घालून तीन ते चार महिन्यांत हा रस्ता पूर्ण करू, असे आश्वासन दिले. 23 नोव्हेंबर 2023 रोजी गडकरी यांनी हे आश्वासन दिले होते. त्यामुळे आतातरी या महामार्गाचे काम दर्जेदार होऊन पूर्ण होईल, अशी आशा या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला आहे. जनतेची मागणी गडकरी नक्की पूर्ण करतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com