Abu Azmi : मराठी-हिंदी वादावरून अबु आजमी भडकले, ठाकरे बंधुंवर साधला निशाणा

Abu Azmi on Marathi Hindi Language Controvercy : 'मुंबईमध्ये भाषेच्या नावाखाली तरुणांना मारहाण तसेच त्यांचे घर आणि दुकाने तोडण्यात येत आहे. याचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे हिंदी भाषिक लोक दहशतीत आहेत. हिंदी भाषिकांना मराठी भाषा येते, परंतु कोणी हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला बेदम मारहाण करण्यात येत आहे.'
Raj-Uddhav Thackeray, Abu Azmi
Abu Azmi addressing the media over the growing Marathi-Hindi language dispute, highlighting concerns about rising attacks on Hindi speakers and political misuse of the issue.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 10 Dec : राज्यात मराठी आणि हिंद भाषेचा वाद चांगलाच पेटला आहे. मध्यंतरी शालेय अभ्यासक्रमातील हिंदी सक्तीवरून चांगलाच तणाव निर्माण झाला होता. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन करण्यात आले होते.

या दरम्यान काही हिंदी भाषकांना मारहाण करण्यात आली होती. काहींची दुकाने फोडण्यात आली होती. या वादामुळे हिंदी भाषिक लोक दहशतीत आहे. काही पक्ष भाषेच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी भाषावाद भडकवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी त्यांनी कुठल्याही पक्षाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा सर्व रोख मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर होता. मुंबईमध्ये भाषेच्या नावाखाली तरुणांना मारहाण तसेच त्यांचे घर आणि दुकाने तोडण्यात येत आहे. याचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे हिंदी भाषिक लोक दहशतीत आहेत. हिंदी भाषिकांना मराठी भाषा येते, परंतु कोणी हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला बेदम मारहाण करण्यात येत आहे.

Raj-Uddhav Thackeray, Abu Azmi
Eknath Shinde : 'फडणवीस सावजीसारखे तिखट अन् नागपुरी संत्र्यासारखे गोड...', एकनाथ शिंदेंकडून स्तुतिसुमनांची उधळण

अशीच घटना अर्णव खैरे या एका तरुणाच्या बाबतीत घडली आहे. ट्रेनमध्ये तो हिंदीमध्ये बोलत असताना काही लोकांनी त्याला मराठी का बोलत नाही, म्हणून बेदम मारहाण केली. यामुळे दहशतीत आलेल्या अर्णवणे गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार केव्हापर्यंत चालणार आहे. मराठी भाषा जर आवश्यक असेल तर ती सर्वांसाठी आवश्यक करण्यात यावी.

Raj-Uddhav Thackeray, Abu Azmi
Baramati ED Raid : बारामतीत ईडीची छापेमारी, मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांची फसवणूक? आनंत लोखंडे विरोधात फास आवळला

राजकीय पक्ष भाषेच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. भाषावाद भडकविण्याचा हा प्रयत्न आहे. गरिबांना मारून काय साध्य करून पाहत आहे असा सवाल करून त्यांनी सरकारने या संदर्भात तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे असे अबू आझमी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com