महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे 'मेरा पोशाख मेरा अधिकार’ आंदोलन

प्रदेश महिला काँग्रेसच्या (Congress) अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार आज 'मेरा पोषाख मेरा अधिकार' हे आंदोलन (Agitation) करण्यात आले.
Congress Chandrapur
Congress ChandrapurSarkarnama
Published on
Updated on

चंद्रपूर : कर्नाटकमधील भाजप (BJP) सरकारने मुलींना हिजाब घालून आल्या म्हणून वर्गात बसू दिले नाही. भारतीय (Indian) संविधानाने प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. यामुळे हिंदू मुस्लिम सौहार्द धोक्यात येऊ शकते, म्हणूनच याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र महिला काँग्रेस, सेवादल शहर महिला काँग्रेस, (Congress) सेवा फाउंडेशन काँग्रेस तसेच काँग्रेसच्या अल्पसंख्याक महिला विभागाकडून आज 'मेरा पोषाख मेरा अधिकार' हे आंदोलन करण्यात आले.

सर्व धर्मीय विद्यार्थी शाळेत शिकत असतात मग आताच हिजाब ला बंदी का? अशी बंदी घातल्यामुळे मुलींचे शिक्षण थांबू शकते. या सर्व घटनांमुळे प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वात व चंद्रपूर (Chandrapur) शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. कर्नाटकमधील शिक्षण संस्थेचा वाद गेल्या चार महिन्यांपासून सुरू होता. पण नेमकी उत्तरप्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा वाद उकरून काढला आहे का? लहानपणापासून आपण बघतोय की सर्व धर्मांची मुले शाळेत शिकतात. पण याआधी असे प्रकार घडले नाही. आता ज्या पद्धतीने या घटना देशात घडत आहेत, त्यामुळे बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांवर जरब बसवायची आहे काय, असा संशय येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

Congress Chandrapur
नानांच्या भंडारा जिल्ह्यात प्रचाराचे पैसे मिळेनात म्हणून काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालून या आंदोलनात सहभाग घेतला व 'लडकी हू लड सकती हूं' 'मेरा लिबास मेरा अधिकार' या घोषणा देऊन कर्नाटक भाजप सरकारचा निषेध केला. या आंदोलनाला अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी,उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवा फाउंडेशन काँग्रेस च्या शहर अध्यक्षा शीतल कातकर, महिला सेवादल च्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे,उपाध्यक्षा परवीन सय्यद, नगरसेवक अमजद अली, सकिना अन्सारी,विणा खनके, मुन्नी मुमताज शेख,शमशाद बेगम, शफिया शेख, शेख,मंगला शिवरकर, समिस्ता फारुकी, वाणी डारला, चंदा वैरागडे,संगिता मित्तल, नेहा मेश्राम, पुष्पा नगरकर, मून्ना तावाडे, नरेंद्र डोंगरे, शहर सचिव हाजी अली, बापू अन्सारी, नाहीद काझी, मोबिन सय्यद, साजिद अली, ऐजाज कुरेशी, बबलू कुरेशी, महेश जिटे, इरफान शेख, किरण वानखेडे यांच्यासह किदवाई शाळेच्या शिक्षिका व विद्यार्थिनींनी आणि बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com