
थोडक्यात महत्वाचे :
नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर महायुती सरकारने एसआयटीच्या नेतृत्वात फेरबदल करून आयपीएस अधिकाऱ्याऐवजी पुण्याचे विभागीय आयुक्त आयएएस चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्रमुख नेमले.
अटकेनंतर शिक्षण विभागात नाराजी व्यक्त झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या आढाव्यानंतर तीन सदस्यीय नवीन पथकाची रचना करण्यात आली.
हे पथक राज्यातील विविध विभागांतील शालार्थ आयडी प्रकरणांची तपासणी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.
Nagpur News : नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करताना मोठी घडामोड घडली आहे. महायुती सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेत्वृतात स्थापन केलेल्या एसआयाटीत मोठा फेरबदल केला आहे. यातून आयपीएस अधिकाऱ्यांना हटवून पुण्याच्या विभागाय आयुक्तांकडे एसआयटीचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. यात राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
पावसाळी अधिवेशनात नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळा चांगलाच गाजला होता. भाजप आमदारांच्या मागणीवरून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. नागपरचे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांना एसआयटीचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी चार दिवसांपूर्वी शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक केल्यावर शिक्षण विभागात खळबळ माजली.
अटकेनंतर शिक्षण विभागात नाराजीचा सूर उमटला. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कामबंद करीत, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निवेदने सादर केलीत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तपास अधिकाऱ्यांना बोलावून घेत आढावा घेतला होता. या आढाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समितीच्या अध्यक्षपदी एका ‘आयएएस’ची नियुक्ती करण्याचे संकेत दिले होते.
एसआयटीची पुनर्रचना करण्यात आली असून पुण्याचे विभागीय आयुक्त आयएएस चंद्रकांत पुलकुंडवार यांना विशेष तपास पथकाचे प्रमुख करण्यात आले आहे. याशिवाय तीन सदस्यीय पथकात कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा आणि सदस्य सचिव म्हणून पुणे येथील शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) हारुण आतार यांची निवड करण्यात आली आहे. हे पथक नागपूर, नाशिक, जळगाव, बीड, लातूर, मुंबई या विभागातील शालार्थ आयडी प्रकरणांची चौकशी करेल.
राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत अनुदानीत आणि अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवासातत्य, विना अनुदानित वरुन अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करून अहवाल शासनास सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या अनुषंगाने प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरता शोधून त्या अनुषंगाने करावयाच्या बदलाबाबत सुधारणा सुचवून आजतागायत प्रकरणांची चौकशी करून तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्यास एसआयटीला निर्देश देण्यात आले आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1: शालार्थ आयडी घोटाळा कोणत्या विभागात उघड झाला?
A: नागपूर विभागात.
Q2: नवीन एसआयटी प्रमुख कोण आहेत?
A: आयएएस चंद्रकांत पुलकुंडवार.
Q3: एसआयटीला किती कालावधीत अहवाल सादर करायचा आहे?
A: तीन महिन्यांत.
Q4: एसआयटी कोणत्या प्रकरणांची चौकशी करणार आहे?
A: शालार्थ मान्यता, सेवासातत्य, विना अनुदानित ते अनुदानित बदली आणि संबंधित घोटाळे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.