Mahavikas Aghadi News : विरोध सभेला नाही तर मैदानाला; भाजप आमदार आक्रमक !

BJP : आमदार कृष्णा खोपडे यांनी आज मैदानावर आंदोलन केले.
Darshan Colony Ground and MLA Krishna Khopde, Nagpur.
Darshan Colony Ground and MLA Krishna Khopde, Nagpur.Sarkarnama
Published on
Updated on

BJP vs Congress : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. सभेची जय्यत तयारी सुरू असताना भाजप आमदार कृष्णा खोपडे, माजी नगरसेवक हरीष दिकोंडवार यांनी सभेसाठी दर्शन कॉलनीतील मैदान देण्यास विरोध केला आहे. त्यावरून नागपुरातील वातावरण चांगलेच तापले आहे. (The atmosphere in Nagpur is very hot)

महाविकास आघाडीच्या सभेला दर्शन कॉलनीतील मैदान दिल्याचा विरोध करण्यासाठी आमदार कृष्णा खोपडे यांनी आज मैदानावर आंदोलन केले. यावेळी त्यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठण केले. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार खोपडे म्हणाले, जेव्हापासून नागपूर सुधार प्रन्यास अस्तित्वात आली, तेव्हापासून है मैदान राजकीय पक्षाला कार्यक्रम किंवा सभांसाठी देण्यात आलेले नाही.

नागपूर शहरातील ११३ मैदाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळांसाठी विकसीत केले आहेत. त्यांपैकी हे एक दर्शन कॉलनीतील मैदान आहे. युवक, युवती या मैदानाचा चांगला उपयोग करीत आहेत. मुलांमध्ये उत्साह आला आहे आणि क्रीडा क्षेत्राकडे मुलामुलींचा कल वाढतो आहे. नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्रस्तरीय क्रीडा स्पर्धा या मैदानावर आजवर झालेल्या आहेत. हजारो खेळाडूंनी हे मैदान गाजवले आहे. हे मैदान खेळाडूंसाठी आहे.

काल एका माजी नगरसेवकाने सांगितले की हे मैदान त्यांनी विकसीत केले. पण जेव्हा हे मैदान विकसीत करण्याचे काम सुरू होते. तेव्हा याच नगरसेवकाने येथे भिंत उभी केली होती. तेव्हा नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वारंवार सांगितले की, ही भिंत तुम्ही तात्काळ काढा. पण त्यांनी ऐकले नाही. मग नासुप्रने ते अतिक्रमण पाडून टाकले. हे मैदान म्हणजे एक मोठा खड्डा होता. त्याचे सपाटीकरण आमच्या काळात केले. येथे मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आले. एक इमारत उभी केली, असेही आमदार खोपडे म्हणाले.

Darshan Colony Ground and MLA Krishna Khopde, Nagpur.
Nagpur News : नितीन गडकरी बिनधास्त पण नाना पटोलेंचे असणार कडवे आव्हान; असे असेल गणित!

त्या इमारतीमधील साहित्य चोरण्याचे कामही त्याच माजी नगरसेवकाने केले. त्या नगरसेवकाचे मनसुबे चुकीचे होते आणि आज तोच शिरजोर होऊ पाहात आहे. हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. येथे एक लाख लोक एकत्र येऊ शकतात, असे महाविकास आघाडीचे नेते सांगत होते. मग काही नेत्यांनी सांगितले की ५० हजार लोक बसतील. परवा कॉंग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी यांनी हसनबाग परिसरात एक बैठक घेतली. तेथे त्यांनी सांगितले की, मी रावण दहन कार्यक्रमासाठी येथे येत होतो, तेव्हा ८० हजार लोक येथे राहात होते. ही सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांची लबाडी आहे.

काल माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी पोलिस ठाण्यात पत्र दिले, तेव्हा त्यांनी सांगितले की, या मैदानावर महाविकास आघाडीच्या सभेला १० हजार लोक येणार आहेत. विदर्भाच्या इतर भागातून सहा हजार आणि नागपूर शहर व जिल्ह्यातून चार हजार लोक सभेसाठी येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. याचा अर्थ यांची हवा आत्तापासूनच टाइट झाली आहे आणि लोक त्यांच्यापासून दूर जात आहेत. लबाडी करून लोकांना भ्रमीत करण्याचे काम महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत, असा घणाघाती आरोप आमदार खोपडे यांनी केला.

Darshan Colony Ground and MLA Krishna Khopde, Nagpur.
Nagpur MNS News : आयुक्त तुम्ही पाकिस्तानचे आहात का? पाण्यासाठी मनसे आक्रमक !

या मैदानाच्या जवळच २० ते २५ एकर खुली जागा आहे. तेथे त्यांनी सभा घ्यायला हवी. पण तेवढे लोक येणार नाहीत. म्हणून हे छोटेसे मैदान घेण्याचा अट्टहास कॉंग्रेसचे नेते करीत आहेत. या मैदानाचा उपयोग केवळ खेळण्यासाठी व्हावा राजकीय कार्यक्रमांसाठी करू नये, असे निवेदन आम्ही नासुप्रला दिले आहे. आता हे मैदान आम्ही राजकीय सभेसाठी देऊ देणार नाही, असा निर्धार आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केला.

नागपुरातील (Nagpur) है मैदान खराब करू नये, यासाठी भगवान हनुमान त्यांना बुद्धी देवो, म्हणून आज येथे आम्ही हनुमान चालिसा पठण केले. दरम्यान भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा (Maavikas Aghadi) प्रतीकात्मक पुतळा जाळला. या विषयात भाजपने न्यायालयात (Court) जाण्याचीही तयारी केली आहे. दीड कोटी रुपये खर्च करून खेळाचे मैदान तयार केले आहे. ते अशा प्रकारे आम्ही खराब होऊ देणार नाही, असेही आमदार खोपडेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com