Nagpur Congress : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे काम पूर्णत्वाकडे...

Vijay Wadettiwar : लवकरच होणार दुसरी बैठक; त्यानंतर अधिकृत घोषणा
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीत जागावाटपाचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित दोन ते चार जागांबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्याअनुषंगाने जागावाटपाच्या मुद्द्यावर त्यांनी मंगळवारी (ता. 16) नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीची दुसरी महत्त्वाची बैठक लवकरच होणार आहे.

Vijay Wadettiwar
Nagpur Congress : जिचकारांच्या आशीर्वाद यात्रेला सुनील केदारांचे पाठबळ

पहिल्या बैठकीत जागावाटपासंदर्भातील 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन ते चार जागांबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित जागांच्या विषयावर चर्चा होणार आहे. पुढील बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा फार्म्युला अंतिम होईल.

महायुतीत एकनाथ शिंदेंचे काय होईल, यावर आपण भाष्य करू शकत नाही. महायुतीच ते ठरवेल. महायुतीत गेलेले घटकपक्ष यांची स्थिती भविष्यात गुलामासारखी होणार आहे. एकतर त्यांना गुलामगिरी करावी लागेल किंवा महायुतीतून बाहेर पडावे लागेल. महायुतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी ते जास्तीत जास्त जागा भाजपा स्वत:कडे ठेवणार आहे, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभाध्यक्षांनी अपात्रतेबाबत दिलेला निर्णय अंतिम नाही. हा निर्णय अयोग्य असल्याचे अनेक ज्येष्ठ विधिज्ञांचे मत आहे. त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शविणारी भूमिका उद्धव ठाकरे घेत असतील तर ती योग्य आहे. रामदास आठवलेंची भाजपमधील स्थिती फारशी चांगली नाही. भाजप सांगेल त्या घाटावरचे पाणी पिण्याचे काम त्यांचे सुरू आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी यावेळी केली. ‘बीएसपी कॅडर’चा फरक महाराष्ट्रात होणार नाही. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत काय झाले हे जनतेला ठाऊक आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, असे त्यांनी नमूद केले.

जनतेची सेवा करण्यापेक्षा सत्तेसाठी लोक एकत्र येतात, तेव्हा महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झालेली मंडळी जनतेच्या सेवेसाठी नाहीत हेच दिसते. आता अशा राजकारण्यांबद्दल जनसामान्यांमध्ये मानसन्मान राहिलेला नाही. याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसनेते सुनील केदार यांनी व्यक्तिगत संबंधापोटी नरेंद्र जिचकार यांना साथ दिली असेल, तर त्यात गैर काही नाही. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला, म्हणून सोबत राहणे चुकीचे नाही, असे म्हणत वडेट्टीवार यांनी केदार यांची पाठराखण केली.

Edited by : Atul Mehere

R...

Vijay Wadettiwar
Nagpur : रामटेक-तुमसर मार्गावर वाळूमाफियांचा महिला एसडीओंवर हल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com