Nagpur Congress : जिचकारांच्या आशीर्वाद यात्रेला सुनील केदारांचे पाठबळ

Narendra Jichkar : काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर नागपुरातील निघाले जनतेमध्ये.
Sunil Kedar & Narendra Jichkar.
Sunil Kedar & Narendra Jichkar.Sarkarnama
Published on
Updated on

Politics : काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदावरून नरेंद्र जिचकार यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. नागपूर येथील संविधान चौकातून त्यांची आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

जिचकार यांच्यावर पक्षातून झालेल्या अन्यायावर त्यांना न्याय मिळेल, असेही काँग्रेसचे नेते सुनील केदार यावेळी बोलताना म्हणाले. जिचकार यांना शुभेच्छा देतानाच केदार यांनी सांगितले, की यात्रेच्या उपक्रमातून नवीन पिढीपर्यंत चांगले विचार पोहोचतील.

Sunil Kedar & Narendra Jichkar.
Nagpur : रामटेक-तुमसर मार्गावर वाळूमाफियांचा महिला एसडीओंवर हल्ला

नरेंद्र जिचकार यांच्यावर अन्याय झाला, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे, असे केदार म्हणाले. आपण आपल्या स्वतःच्या भूमिकेतून अन्यायाविरोधात लढा दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जिचकार यांनी आशीर्वाद यात्रा काढली आहे.

लोकांपर्यंत जाऊन कोणताही विषय मांडणे या देशाची लोकशाही जिवंत असण्याचे द्योतक आहे. लोकशाहीमध्ये लोकांपर्यंत सर्व मुद्दे जाणे गरजेचे आहे. तो प्रत्येक माणसाचा कर्तव्याचा भाग आहे. अंतर्गत विषय असल्याने पार्टीच्या माध्यमातून जिचकार यांना न्याय मिळेल. आपण जिचकार यांच्यासोबत पहिलेही होतो, आताही आहे, असे केदार यांनी स्पष्ट केले. काँग्रेस ही सकारात्मक विचारधारा आहे, असेही त्यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नरेंद्र जिचकार यांच्यावर अन्याय झाला आहे. या अन्यायाविरोधात लढलेच पाहिजे. आम्ही अन्यायाविरोधात लढू आणि जिंकू, असेही केदार यांनी नमूद केले. नरेंद्र जिचकार यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. जिचकार यांनी आपल्या यात्रेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर टीका केली. आशीर्वाद यात्रेला केदार यांनी पाठिंबा दिल्याने नागपूर काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि सुनील केदार असे दोन गट निर्माण झाल्याची चर्चादेखील आहे.

काँग्रेसच्या सभेत नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्याशी वाद झाल्यानंतर नरेंद्र जिचकार यांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने आधी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नंतर त्यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. विकास ठाकरे यांच्याविरोधात आवाज उठवल्याने प्रदेश नेतृत्वाने पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविल्याचा आरोप करीत नरेंद्र जिचकार यांनी आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे.

Sunil Kedar & Narendra Jichkar.
Nagpur BJP : प्रदेश काँग्रेसमधील दोन कार्याध्यक्ष सोडणार ‘पंजा’ची साथ

काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदावर बसलेले लोक काँग्रेसच्या हितासाठी नाही, तर भाजपच्या हितासाठी काम करतात, अशी टीकाही जिचकार यांनी केली आहे. काँग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली असतानाच नागपूर काँग्रेसमध्ये अन्यायाचा हा वाद पेटल्याचे बघायला मिळत आहे.

Edited By : Atul Mehere

R...

Sunil Kedar & Narendra Jichkar.
Nagpur NDCCB Bank : ‘पळणारा नाही, भिडणारा नेता’ म्हणत कार्यकर्त्यांचा जल्लोष!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com