Maval Bazar Samiti : मावळ बाजार समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; आघाडी धर्म धुडकावत काँग्रेसला डावलले..

Maval Market Committee News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे संभाजी शिंदे, तर उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची बिनवरोध निवड..
Maval Market Committee News : Pune News :
Maval Market Committee News : Pune News : Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मावळ (जि.पुणे) तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक आज निवडणूक होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. अपक्षेप्रमाणे निवडणूक बिनविरोध होऊन, राष्ट्रवादी काँग्रेसने गुलाल उधळला आहे. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी शिंदे, तर उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची बिनवरोध निवड झाली आहे.

Maval Market Committee News : Pune News :
Manchar Bazar Samiti : देवदत्त निकमांच्या बंडखोरीमुळे गाजलेल्या मंचर बाजार समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे भालेराव

मावळ (Maval) बाजार समितीच्या २८ एप्रिलला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या सहकार पॅनेलने प्रतिस्पर्धी भाजपचे (BJP) माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडविला होता. मावळात राष्ट्रवादीचेच आमदार शेळके यांनी प्रतिस्पर्धी भाजप पुरस्कृत पॅनेलला १७-१ अशी धूळ चारली होती.

मावळात सभापतीपद राष्ट्रवादीचा आणि उपसभापती कॉंग्रेसचा होईल, असे संकेत होता. मात्र दोन्ही पदे आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे ठेवल्या आहेत. त्यानुसार आज सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी शिंदे, तर उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची बिनवरोध निवड केली आहे.

Maval Market Committee News : Pune News :
UPSC Result : 'युपीएससी'त 'सारथी'चे यश ; 17 उमेदवार प्रशासकीय सेवेसाठी सज्ज !

विरोधी पॅनलचा धुव्वा उडाल्याने त्यांनी सभापती आणि उपसभापतीपदावर दावा केला नाही. यामुळे ही निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. १८ सदस्यसंख्या असलेल्या मावळ बाजार समितीत महाविकास आघाडीने १७ जागा मिळवल्या, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला १५ तर काँग्रेसला दोना जागा मिळाल्या. यामुळे आघाडीधर्म पाळून काँग्रेसकडे उपसभापतीपद दिले जाण्याचा संकेत पाळला जाईल, अशी चर्चा होती. मात्र स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी आघाडी धर्माचे पालन न करता, दोन्ही पदे आपल्याकडे ठेवली, अशी चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com