अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. ठिकठिकाणी फलक झळकावून काही इच्छुक आपल्याकडे लक्ष वेधून घेत आहेत. यात काही मतदारसंघाच्या बाहेरचे आणि भाजपचे सदस्य नसलेल्या इच्छुकांचाही समावेश आहे. त्यामुळे स्थानिक नेते अस्वस्थ झाले आहेत. याकरिता काही पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन स्थानिकांनाच उमेदवारी द्या, अशी मागणी करून पक्षावर दबाव वाढवण्यात आला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांना शहरातील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये मताधिक्य होते. उत्तर नागपूर त्यास अपवाद होता. दहा वर्षांपूर्वी भाजपचे मिलिंद माने येथून निवडून आले होते. त्यांच्या विजयात 'बसपा'च्या उमेदवाराचा वाटा मोठा होता. 'बसपा'चे तत्कालीन उमेदवार किशोर गजभिये यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. नंतरच्या निवडणुकीत 'बसपा'चा ग्राफ घसरताच नितीन राऊत ( Nitin Raut ) यांनी पुन्हा कमबॅक केले.
भाजपने ( Bjp ) विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्व्हे केले आहे. मात्र, उत्तर नागपूरचा समावेश नव्हता, असे सांगण्यात येते. त्यावरून ही जागा शिंदे सेनेला सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सेनेच्यावतीने जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लकन पार्टीला ही जागा देणार असल्याचे बोलल्या जात असले तरी तसे काही दिसत नाही. अद्याप कवाडेंच्या पक्षाकडून आणि शिंदे सेनेच्यावतीने कोणीही निवडणुकीची तयारी सुरू केलली नाही. त्यामुळे ही फक्त चर्चा असल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगतात.
भाजपचे काही नेते आपल्या जवळचा उमेदवार 'प्लांट' करीत असल्याची चर्चा आहे. पोलिस खात्यात नोकरीला असलेले संदीप शिंदे यांचे पोस्टर या मतदारसंघात अचानक झळकायला सुरुवात झाली आहे. ते भाजपचे प्राथमिक सदस्यसुद्धा नाहीत. शिंदे यांच्या मागे उभी असलेली अदृष्य शक्ती अद्याप समोर आलेली नाही. असे असले तरी शिंदे यांच्यामार्फत काही मंडळांना रसद पुरवल्या जात आहे. यातच भाजपच्यावतीने तीन इच्छुकांच्या नावांचा लिफाफा प्रदेश भाजपकडे रवाना झाला आहे. यात कोणाचे नावे गेली याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे नितीन राऊत यांच्यासमोर महायुतीचा तुल्यबळ उमेदवार असणार? हे आगामी काळात कळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.