Nagpur News : मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवत असल्याचे बघून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने शनिवारपासून (ता.30) नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आमरण उपोषण आणि गरज भासल्यास मुंबईकडे कूच करण्याचे ठरवण्यात आले. त्यावरून पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी (OBC) असा संघर्ष निर्माण होणार आहे.
मराठा नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. हजारो प्रतिनिधींना घेऊन ते मुंबईकडे निघाले आहेत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा आणि आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आहे. यासाठी ते सरकारवर दबाव वाढवत आहेत. जिल्ह्या-जिल्ह्यातून मराठा समाताचे प्रतिनिधी त्यांच्या आंदोलनात सहभागी होत आहेत. आंदोलकांच्या दबावात येऊन राज्य सरकार मागण्या मान्य करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हे बघून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आज गुरुवारी तातडीने एक बैठक बोलावली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शंभर लोकांनी सहभाग नोंदवला. काही प्रतिनिधींनी ऑनलाइन उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. त्यास आमची हरकत नाही. मात्र ओबीसीचे 27 टक्के आरक्षण कायम ठेवावे अशी मागणी सर्वांनी केली. ओबीसी समाजात शेकडो जातींचा समावेश आहे. त्या तुलनेत 27 टक्के आरक्षण हेच अपुरे आहे.
यास विरोध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आमरण उपोषण व मुंबईत आंदोलन असे सर्वानुमते ठरवण्यात आले. या बैठकीला बुलढाणा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली येथील ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यात प्रामुख्याने नागपूर शहर अध्यक्ष परमेश्वर राऊत, ग्रामीण अध्यक्ष राजू चौधरी, शकील पटेल, खुशाल शेंडे, सुभाष घाटे, प्रकाश साबळे ओमप्रकाश फुके, अनिल शास्त्री, दौलत शास्त्री, सुरेश कोंगे, सुरेश जिचकार, एकनाथ काळमेघ, सुरज बेलोकर, नाना झोडे, नीलेश कोडे, ऋषभ राऊत, विजय ढवंगळे, श्याम लेंडे आदी इत्यादी हजर होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.