फडणवीस अनेक शस्त्र आता बाहेर काढतील, आमदार बावनकुळेंचा दावा...

त्यांच्याकडे (Devendra Fadanvis) असे अनेक शस्त्र आहेत. येणाऱ्या काळात ते बाहेर निघतील, असा दावा भाजपचे प्रदेशचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : महाराष्ट्र (Maharashtra) अशांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) घाट आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची चोकशी करायची सोडून राज्य सरकारने आमचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाच नोटीस पाठवली, हे कृत्य चुकीचे आहे. पोलिसांनी तात्काळ नोटीस परत घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांनी सध्या एकच बॉम्ब फोडला आह. त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र आहेत. येणाऱ्या काळात ते बाहेर निघतील, असा दावा भाजपचे प्रदेशचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawnkule) यांनी केला आहे.

पोलिसांच्या बदली संदर्भातला अहवाल लिक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना चौकशीची नोटीस पाठवली. त्याच नोटिशीचा निषेध करण्यासाठी आज नागपुरातील हजारो भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात यावेळी नोटिशीची होळी करण्यात आली. या आंदोलनात पद्मश्री खासदार विकास महात्मे, माजी मंत्री अनिल बोन्डे, भाजपा शहरअध्यक्ष आमदार प्रवीण दटके, नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार गिरीश व्यास, प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, महामंत्री अविनाश खळतकर, शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष पारेन्द्र पटले, ग्रामीण भाजयुमोचे अध्यक्ष आदर्श पटले, विशाल भोसले, संजय फांजे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आमदार बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलेल्या पोलीस बदल्यांच्या घोटाळ्याचा राज्य सरकारने तपास करावा. माहितीचा स्रोत विचारण्यापेक्षा ती खरी की खोटी याची चौकशी करावी आणि दोषी मंत्र्यांवर कारवाई करावी. नोटीस पाठवून देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्य सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, हे चुकीचे आहे. अशा दबाव तंत्राने भाजपाचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. आम्ही महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेपर्यंत पोहोचून राज्य सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आणू.

Chandrashekhar Bawankule
गोरखपुरचे प्रभारी राहिलेले बावनकुळे म्हणाले, योगींना मिळणारे जनसमर्थन अभूतपूर्व आहे...

विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधील भ्रष्टाचार आणि नियमबाह्य गोष्टी बाहेर आणण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्याच अधिकारान्वये देवेंद्र फडणवीस माहिती विधिमंडळात आणि जनतेसमोर मांडत असल्याचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com