Maratha Reservation : चंद्रशेखर बावनकुळेंनी जरांगे पाटलांना केले ‘हे’ आवाहन !

OBC Reservation : अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्काही लागणार नाही.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. आताही विशेष अधिवेशन होत आहे. त्यात सर्वपक्षीय आमदार बहुमताने मुख्यमंत्री जो कायदा आणतील, त्याला पाठिंबा देतील. भाजपचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल. ओबीसींचे ‘शून्य पॉइंट एक टक्काही’ आरक्षण कमी केला जाणार नाही. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

आज (ता. 16) नागपुरात पत्रकारांशी बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाने प्रस्ताव दिला आहे. सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी राज्यात सर्वेक्षण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. भाजपसुद्धा मराठा आरक्षण द्यावे आणि कोर्टाच्या चौकटीत बसवून द्यावे या मताचे आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतलेली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने पूर्ण अभ्यास केला आहे. सरकारने कायद्याच्या अडचणी तपासल्या आहेत. या अडचणी सोडविल्या असतील, असे आपल्याला वाटते. मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे टिकणारे आरक्षण असेल असेच वाटत असल्याचे बावनकुळे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की, त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. सरकारने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करावे आणि उपोषण मागे घ्यावे, असे ते म्हणाले. योग्य आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankule
Bawankule News : स्वातंत्र्यवीरांच्या गावातून बावनकुळे गरजले; म्हणाले, एवढी ‘त्यांची’ उंची नाही !

घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कोणताही दुसरा हेतू नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सगळ्यांची मागणी आहे. पुढच्या काळात जनगणना व्हावी, ही मागणी असेल, पण त्यासाठी कायदा बदलावा लागेल असेही बावनकुळे यांनी सांगितले. अजित पवार ज्यांना घड्याळ निवडणूक चिन्हावर निवडणुकीत उभे करतील त्यांना पूर्ण ताकदीने 51 टक्के मत घेऊन विजयी करायचे आहे. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांनी दिलेल्या उमेदवारच विजयी होईल. हा अहंकार नसून जनतेवरील विश्वास आहे. बारामतीवर विश्वास आहे.

विकासाच्याबाबत बारामतीकरांना मोदी यांची गॅरंटी आहे. अजितदादा बारामतीचे नेते आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. बारामती त्यांचा गृहजिल्हा आहे. तेथे उमेदवार देण्यासाठी एकमत होईल असेही बावनकुळे म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी राहुल गांधी यांना समजवायला हवे. गांधी रोज ओबीसींचा अपमान करीत आहेत.

नाना पटोले यांनी तर या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी आपण केली होती. त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. महाराष्ट्रातून भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला 713 लोक जाणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यासह अन्य दोन राज्यसभा उमेदवार यात असतील. शिबिरातून जी काही शिदोरी मिळेल, त्याच्या पाठीशी महाराष्ट्र कसा उभा राहील, ते पाहणार असल्याचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या बाजूने, बावनकुळे बघा काय म्हणाले ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com