Nagpur and Chandrapur OBC-Teli News : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. असे केल्यास एकंदरीतच ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींवर तो अन्याय होणार आहे. त्यामुळे तेली समाज आक्रमक झाला आहे. येत्या रविवारी (ता. १७) चंद्रपुरात निघणाऱ्या महामोर्चात तेली समाज सहभागी होणार आहे. (Meeting tomorrow morning at 10 AM at Jawahar Vidyarthi Griha)
या महामोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास अन्य समाजांवर अन्याय होणार आहे. त्याचा विरोध काल (ता. १०) बैठकीत करण्यात आला. चंद्रपूर येथील स्व. बाळू धानोरकर अभ्यासिकेत तेली समाजाची आढावा बैठक घेण्यात झाली.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून मराठ्यांचे सरसकटओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसीमध्ये (OBC) असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजांवरदेखील हा अन्याय होणार आहे.
तेली समाज रस्त्यावर उतरून सरकारचा (State Government) विरोध करेल, असे प्रा. सूर्यकांत खनके म्हणाले. बैठकीला प्राध्यापक डॉ. नामदेवराव वरभे, प्रा. प्रवीण पोटदुखे, डॉ. संजय बेले, विदर्भ (Vidarbha) तेली समाज महासंघाचे शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, गोविल मेहरकुरे, आकाश साखरकर उपस्थित होते.
नागपुरात उद्या बैठक...
तेली समाजाच्या सर्व शाखीय, सर्व पक्षीय, सर्व संघटनांच्या वतीने उद्या (ता. १२) सकाळी १० वाजता सिव्हिल लाइन्समधील जवाहर विद्यार्थिगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. परंतु आरक्षण देताना ओबीसी समाजाला मिळत असलेल्या १९ टक्के आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.
नागपूर येथे सर्व शाखीय, सर्व पक्षीय, सर्व संघटनांची बैठक आयोजित करून पुढील भूमिका तसेच दिशा ठरविण्यासाठी व आरक्षणाच्या लढ्यात सामील होण्यासाठी या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत. सुभाष घाटे हे या बैठकीचे संयोजक आहेत. बैठकीला समाजातील प्रमुख संघटना, पदाधिकारी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे ईश्वर बाळबुधे यांनी सांगितले आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.