Maratha VS OBC News : ओबीसी क्रांती मोर्चाच्या अध्यक्षांना अटक; मंत्री सावंतांना दाखवणार होते काळे झेंडे !

Uday Samant : उद्योगमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता.
Sanjay Mate, OBC Kranti Morcha
Sanjay Mate, OBC Kranti MorchaSarkarnama
Published on
Updated on

Bhandara OBC Kranti Morcha News : भंडारा ओबीसी क्रांती मोर्चाच्या इशाऱ्यानंतर अध्यक्ष संजय मते यांच्यासह दोन पदाधिकाऱ्यांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज (ता. १०) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या वेळी उद्योगमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी मतेंनी केली होती. (Uday Samant : Industry Minister was warned to show black flags)

भंडारा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या वेळी उद्योगमंत्र्यांना ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. ही बाब लक्षात घेता भंडारा शहर पोलिसांनी संजय मते, जिल्हा उपाध्यक्ष श्याम कांबळे व सदस्य अमर भुरे यांना त्यांच्या कार्यालयातून अटक केली आहे.

(Eknath Shinde) शिंदे-फडणवीस-पवार (Ajit Pawar) सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करत कुणबी समाजाचे दाखले देण्याची भूमिका घेतली आहे. याविरोधात भंडाऱ्यात (Bhandara) येणाऱ्या मंत्री उदय सावंत यांना ओबीसी क्रांती मोर्चा त्यांना काळे झेंडे दाखवत आपला रोष व्यक्त करणार होते, ‘सरकारनामा’ने ही बातमी प्रकाशित करताच भंडारा पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने संजय मते यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह ताब्यात घेतले आहे.

विशेष म्हणजे मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास वैनगंगा नदीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाकडून याआधीच देण्यात आला आहे. या संघटनेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या विरोधात एलगार पुकारल्याचे दिसत आहे. आता पुन्हा मंत्र्यांनाच काळे झेंडे दाखविणार असल्याच्या इशाऱ्यानंतर भंडारा पोलिसांनी त्यांना अटक केली.

Sanjay Mate, OBC Kranti Morcha
Bhandara Political Climate News : पावसांच्या सरींनी वातावरणात गारवा, पण नेत्यांच्या यात्रांनी तापू लागले राजकीय वातावरण !

मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून मराठा नेते मनोज जरांगे यांनी जालन्यात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची खालावत चाललेली प्रकृती व मराठ्यांचा सुटत असलेला संयम पाहता सरकारवर अधिक दबाव वाढत चालता आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पण त्यात यश येताना दिसत नाही.

मराठा नेते मनोज जरांगे यांचे सुरू असलेले आमरण उपोषण, इकडे ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर मंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा दिलेला इशारा, यामुळे भंडारा जिल्हा प्रशासन आणखी पेचात पडले आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचा वाढता विरोध सध्या तरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com