Yavatmal District's Maregaon APMC Election Result : यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवीत सहकार क्षेत्रात अजूनही वरचढ आहोत, हे दाखवून दिले आहे. भाजपला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. (BJP had to settle for one seat)
सहकार क्षेत्रामध्ये वर्चस्व असलेल्या काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासोबत आघाडी केली होती. सहकारी संस्था गटामध्ये काँग्रेस आघाडीने १८ पैकी १७ जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले. यात सर्वसाधारणमध्ये वसंत आसूटकर, जीवन काळे, यादव काळे, काशिनाथ खडसे, गौरीशंकर ओमप्रकाश खुराना, ब्रम्हदेव मारोती जुनगरी, गणू देवाजी थेरे विजयी झाले.
सहकारी संस्था महिला गटातून अरुणा खंडाळकर, सुनिता मस्की, सहकारी संस्था अनुसूचित जमाती मतदारसंघातून संतोष भिमाजी मडावी, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून रमण डोये, ग्रामपंचायत मतदारसंघातून आर्थिकदृष्ट्य़ा दुर्बल घटक मतदारसंघातून अविनाश देवीदास लांबट (युती पॅनल), विजय अवताडे, प्रफुल्ल विखनकर, हमाल मापारी मतदारसंघात भास्कर नारायण धांडे, व्यापारी अडते मतदारसंघातून देवीदास बोबडे व महादेव साळवे हे दोघेही विजयी झालेत, तर विश्वनाथ आत्राम हे बिनविरोध निवडून आले.
आजी-माजी आमदारांत झाली लढत..
मारेगाव तालुक्याचे लक्ष केंद्रित झालेल्या बाजार समितीच्या या निवडणुकीत काँग्रेस - शिवसेना ठाकरे गट यांनी एकहाती सत्ता मिळविली आहे. माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे, जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक गौरीशंकर खुराना, राष्ट्रवादीचे नगरसेवक हेमंत नरांजे यांच्या नेतृत्वात पॅनल उभे करून ही निवडणूक लढली गेली. भाजप-शिंदे गट शिवसेना पॅनलचे नेतृत्व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शंकर लालसरे, ज्ञानेश्वर चिकटे, अनिल देरकर, शिंदे गट शिवसेनेचे विशाल किन्हेकर, विजय मेश्राम यांनी केले.
बोरी बाजार समितीवर पुन्हा सुभाष ठोकळ पॅनल..
बोरी बाजार समितीवर पुन्हा एकदा सुभाष ठोकळ पॅनलची सत्ता कायम राहिली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC Election) शिंदे गट (Eknath Shinde) -राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अशी युती झाली होती. या आघाडीने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळविला आहे. (BJP) भाजप-काँग्रेस आघाडीला पाच जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत अक्षय ठोकळ, विराज घुईखेडकर, विलास दुधे, विजय कावरे, गोविंद राऊत, मोहन जाधव, कोमल चारोळे, ज्योती जाधव, सतीश शेटे, विकास क्षीरसागर, धर्मेद्र दुधे, रोहन जयस्वाल, विनोद गुल्हाने, नरेंद्र तिवारी, मिलिंद रामटेके विजयी झाले आहेत.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.