Mayor Reservation: महापौरपद आरक्षण सोडतीवरून मोठा वाद! ठाकरे सेनेचा आक्षेप, काँग्रेसचा खळबळजनक आरोप

Mayor Reservation: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या महापौर आरक्षण सोडतीवरुन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
BMC mayor Race
BMC mayor RaceSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Mayor Reservation: महापौराच्या आरक्षणाच्या सोडतीवरून मोठा वाद उफाळून आला आहे. उद्धव उद्धव ठाकरे सेनेने मुंबईच्या सोडतीवर आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात महिलेसाठी महापौरपद राखीव झाले आहे. भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार शिवानी दाणी ठरल्या होत्या. त्यानुसार आरक्षण काढण्यात आलं, हे सर्व फिक्सिंग होतं असा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

BMC mayor Race
Nagpur Mayor : मुख्यमंत्री कार्यालयातील 'सल्लागार' नागपूरच्या महापौर होणार? भाजपच्या आधी काँग्रेस नेत्यानेच जाहीर केले नाव

यापूर्वी पाच वर्षे नागपूरमध्ये खुल्या प्रवर्गातील महापौर होते. संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी यांना भाजपने विभागून महापौर केले होतं, ते खुल्या प्रवर्गातील होते. नागपूरमध्ये मागील २५ वर्षांपासून अनुसूचित जातीचे आरक्षण निघाले नाही. ते यावेळी निघेल असेच सर्वांना वाटत होते. मात्र, यावेळी पुन्हा एकदा खुला प्रवर्गासासाठी सोडत निघाली, त्यावरून शंका घेतल्या जात आहे. शिवानी दाणी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहेत, त्यांचे नाव भाजपने आधीच ठरवले होते. त्यानुसार आरक्षणाची सोडत काढली असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. गुरुवारी २९ महापालिकेच्या महापौरांच्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली. पण ही फिक्सिंग होती, पारदर्शक पद्धतीने आरक्षण प्रक्रिया पार पाडली गेली नाही. ज्या ज्या महापालिकेत भाजपची सर्वाधिक नगरसेवक निवडून आले त्या त्या महापालिकेत सोयीने आरक्षण काढण्यात आले.

BMC mayor Race
Solapur Mayor : सोलापूरचे महापौरपद खुले; भाजपची ही तीन नावे आघाडीवर

चंद्रपूर महापालिकेमधील वादावर पडदा पडला आहे. येथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार आहेत. चंद्रपुरात पाच वर्षे काँग्रेसचा महापौर असणार, सगळ्यांचे समाधान होईल असा निर्णय काँग्रेस घेणार असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला. भाजपचे नेते कितीही ओरडले तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार आहे. नेत्यांमध्ये गैरसमज होत असतात पण कार्यकर्ता हा महत्त्वाचा असतो. महापौर बसविण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा झाली आहे.

BMC mayor Race
Sarita Mhaske : 'शिंदेंच्या नेत्याकडून माझ्या अपहरणाचा प्रयत्न...' ठाकरेंच्या शिवसेनेच्या 'नॉट रिचेबल' झालेल्या नगरसेविकेचा खळबळजनक आरोप

शिवसेना हा पक्ष काँग्रेस बरोबर सत्तेत असेल. चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र असल्याचे दिव्य स्वप्न मनसे नेत्यांना कुठून पडले? लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम मनसेने करू नये. मनसे भाजपची बी टीम आहे, अशी टीका काँग्रेसने केली तर चालेल का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रात भाजप आणि एमआयएम हे पक्ष एकत्र आहेत. ते रात्री एकत्र जेवतात दिवसा भांडतात. काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वापर केला जात असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com