Akola Raid News: कृषी विभागाच्या 'त्या' छापेमारीवर मंत्री सत्तारांची सारवासारव; खंडणीसह शिवीगाळ, मारहाणीचाही पथकावर आरोप

Abdul Sattar On Akola Raid : कृषीमंत्र्यांसाठी कथित पथकाची वसुली ? आमदार नितीन देशमुख आणि अमोल मिटकरींचा सत्तारांवर निशाणा
Minister Abdul Sattar News
Minister Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Akola : शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीतील कृषी खत कंपनीवर कृषी विभागाच्या कथित पथकाकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या. मात्र, आता या धाडी वादात सापडल्या आहेत. छापा टाकणाऱ्या पथकामध्ये कृषिमंत्र्यांच्या स्वीय सहायकासह काही खासगी व्यक्ती असल्याचा आरोप आहे. या पथकाने दमदाटी करून पाच लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसांकडे देण्यात आली आहे.

कृषिमंत्र्यांच्या नावावर पथकानं अकोला(Akola) शहरातील औद्योगिक वसाहतीमधील खत कंपनीच्या गोदामावर छापा टाकला. यानंतर या पथकातील खासगी व्यक्तींनी मालाची नासधूस केली. यावेळी काही उत्पादकांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला. तसेच पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकानं तक्रारीत केला आहे. यानंतर आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे.

Minister Abdul Sattar News
Akola News : देशमुख म्हणाले; ‘हा’ वसुलीचा फंडा, तर शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम सुरू असल्याची मिटकरींची टिका!

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सारवासारव...

कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी या प्रकरणी सारवासारव करताना या धाडी माझ्या सांगण्यावरूनच टाकण्यात आल्याचं सांगितलं आहे. यावेळी सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांसह सर्वानाच छापे टाकण्याचा अधिकार आहे. माझ्या सांगण्यावरूनच ते छापे टाकण्यात आले. त्यामध्ये माझे स्वीय सहायक नव्हते असल्याचंही ते म्हणाले.

...तर 'लाचलुचपत'कडे तक्रार करावी!

व्यावसायिकांना काही अडचण असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(ACB) कडे तक्रार करावी. कृषी, महसूल व पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक तयार करून छापे टाकावे अशी माझी भूमिका आहे. बियाणे, खत व कीटकनाशकांमध्ये गैरकारभार खपवून घेणार नाही असल्याचा इशाराही सत्तार यांनी दिला आहे.

Minister Abdul Sattar News
Abdul Sattar : माझ्याच पक्षातील नेते...; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटात खळबळ

दीपक गवळी कोण?

यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह हितेश सुरेश भट्टड, दीपक गवळी, दीपक राजपूत, भीमराव कुलकर्णी व छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, नागपूर येथील हितेश भट्टड यांच्यावर कृषी संबंधित घोटाळय़ाचे अनेक गुन्हे आहेत. या पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचे स्वीय सहायक दीपक गवळी देखील असल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

अकोला शहरातील कृषी व्यावसायिकांच्या गोदामावर कृषिमंत्र्यांशी संबंधित असलेल्या काही व्यक्तींच्या पथकाकडून छापेमारी सुरू करण्यात आली. दरम्यान, पुणे येथील कृषी उत्पादन गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत ७ जून रोजी हा छापा टाकण्यात आला. या पथकाकडून खासगी व्यक्तींनी काही उत्पादकांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला. आणि पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप कंपनीच्या व्यवस्थापकानं तक्रारीत केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com