Dilip Valse Patil News : पालकमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच वळसे पाटील 'इन अॅक्शन' ; कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

NCP News : राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपलाच पक्ष खरा असल्याचा दावा केला जात आहे.
Dilip Valse Patil
Dilip Valse PatilSarkarnama
Published on
Updated on

Akola News : राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपलाच पक्ष खरा असल्याचा दावा केला जात आहे. बुधवारी बुलडाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी लगेच अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या मेळाव्यात आपलाच गट हा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष असल्याचे सांगत संघटनवाढीसाठी जिल्ह्यात एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

अकोला जिल्ह्यात दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून बैठका घेण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आपल्या गटाची ताकद कशी वाढणार, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला आमदार माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार तथा प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, विदर्भाचे अध्यक्ष निखिल ठाकरे, महानगराध्यक्ष विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, माजी आमदार तुकाराम बिडकर, वाशीमचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी, अजय मते उपस्थित होते.

Dilip Valse Patil
Marathi School News : पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केलात तर याद राखा; नाना पटोले कडाडले

भाजपसोबत (BJP) गेलेल्या अजित पवारांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सोबत येण्यासाठी अनेकदा साकडे घातले. मात्र, शरद पवार हे भाजपसोबत जाण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीची उभारणी करण्यासाठी ते पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अखेर अजित पवार गटानेही स्वतंत्रपणे पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरविलेले दिसते. त्यातून मंत्र्यांकडे राज्यातील जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यातही आता अजित पवार गट अधिक सक्रिय झाला असून, पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यातून आपली ताकद दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

तुमच्या तोंडात साखर पडो...

भाजपकडून अजित पवार यांना सहा महिन्यांसाठी नाही, तर पाच वर्षे मुख्यमंत्री करायचे आहे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, 'तुमच्या तोंडात साखर पडो' असे वळसे पाटील म्हणाले. आमच्या सरकारमध्ये कुठलीच नाराजी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

'वंचित' हाच आपला राजकीय विरोधक

अकोला आणि बुलडाणासारख्या जिल्ह्यांत वंचित बहुजन आघाडीच आपला विरोधक असल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या विरोधातच आपल्याला लढायचे आहे. वंचित बहुजन आघाडीमुळेच माझा लोकसभेत पराभव झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसला वंचितचा फटका बसत असल्याचे शिंगणे यांनी सांगितले.

मिटकरींनी घेतली दोन आमदार निवडून आणण्याची जबाबदारी...

दिलीप वळसे पाटील यांनी वाशीम जिल्हाध्यक्षांनी निवड केल्यानंतर त्यांनी आपण वाशीममध्ये दोन आमदार निवडून आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावर आमदार अमोल मिटकरी यांनीही अकोला जिल्ह्यात दोन आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणणार, अशी ग्वाही दिली.

Edited by : Amol Jaybhaye

Dilip Valse Patil
Eknath Shinde News : नांदेडमधील घटनेनंतर CM शिंदेंनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना घेतलं फैलावर, दिला 'हा' इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com