Marathi School News : पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केलात तर याद राखा; नाना पटोले कडाडले

Zilla Parishad schools : शाळा बंद करून बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा मनुवादी सरकारचा डाव...
Marathi School News : पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केलात तर याद राखा; नाना पटोले कडाडले
Published on
Updated on

Mumbai News : कमी पटसंख्येचे कारण समोर करत राज्य सरकार जिल्हा परिषदेच्या जवळपास १५ हजार शाळा बंद करून समूह (ग्रुप) शाळा सुरू करणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार हल्लाबोल आज केला. शाळा बंद करून बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा मनुवादी सरकारचा डाव असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. तसेच शाळा बंद कराल तर याद राखा, असा इशारा पटोलेंनी सरकारला दिला. (Latest Marathi News)

Marathi School News : पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केलात तर याद राखा; नाना पटोले कडाडले
Womens Reservation : महिला आरक्षण विधेयक मंजूर होताच भाजप कार्यालयात जल्लोष सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य असताना वीस किलोमीटरच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून, एकच शाळा सुरू ठेवण्याचा सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर पटोलेंनी तोफ डागली. त्यामुळे एक लाख ८५ हजार विद्यार्थी आणि २९ हजारांपेक्षा जास्त शिक्षकांच्या अडचणींत भर पडेल. त्यांना पायपीट करावी लागेल. ग्रामीण, दुर्गम भागात वाहतुकीची साधने पुरेशी नाहीत. अशा परिस्थितीत वीस किलोमीटरच्या क्षेत्रात एकच शाळा ठेवण्याचा निर्णय निर्बुद्धपणाचा व कसलाही विचार न करता घेतलेला दिसत आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.

Marathi School News : पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केलात तर याद राखा; नाना पटोले कडाडले
Nagaland NCP MLA Meet Mumbai : नागालँडमधील राष्ट्रवादीचे आमदार मुंबईत येणार; पण कारण काय ?

ग्रुप शाळांचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता. पण, तो अपयशी ठरला, याकडे पटोलेंनी लक्ष वेधले. आता पुन्हा या निर्णयामुळे सामान्य कुटुंबातील मुले-मुली शिक्षणांपासून वंचित होतील, खासगी महागडे शिक्षण हे ग्रामीण, दुर्गम व वाड्या-वस्त्यांवरील मुलांना परवडणारे नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी यासंदर्भात तातडीने खुलासा गरणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. गरिबांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com