Chandrapur News : मुनगंटीवारांनी दिली अशी भेट, शिंदे-फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्यच फुलले

Sudhir Mungantiwar : बल्लारपूर येथे 67व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद‌्घाटन
Chandrapur News
Chandrapur NewsSarkarnama
Published on
Updated on

Ballarpur : आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे भाजप नेते तथा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (ता. 27) चंद्रपुरात असे काही केले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात 67व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे स्वागत चंद्रपूरचे पालकमंत्री या नात्याने मुनगंटीवार यांनी केले. मुनगंटीवार यांनी कार्यक्रमादरम्यान शिंदे, फडणवीस यांच्या स्वागतप्रसंगी त्यांना दिलेली भेटवस्तू व त्यातून त्यांनी दिलेला अप्रत्यक्ष संदेश कार्यक्रमस्थळी चर्चेचा विषय ठरले.

Chandrapur News
Ajit Pawar Group : अजित पवारांचं शिंदेंच्या पावलावर पाऊल ? राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर भर, 'या' दोन तरुणांवर मोठी जबाबदारी

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपसोबत आलेत व मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेत. शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समक्ष सध्या सुनावणी सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगासमोर झालेल्या लढ्यात शिंदे यांनी शिवसेना हे नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण जिंकले आहे. नेमका हाच धनुष्यबाण मुनगंटीवार यांनी शिंदे यांना स्वागत करताना भेट दिला.

मुनगंटीवार यांनी धनुष्यबाण देताच मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले. धनुष्यबाण हा आपलाच आहे, असे मिश्किलपणे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी आहेत. आदिवासी समाजात धनुष्यबाणाला (तीरकमान) मोठे महत्व आहे. त्यामुळे ही संबंध स्वागतप्रसंगी जुळला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे यांचे स्वागत केल्यानंतर स्वागत करण्याचा क्रमांक आला तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. यावेळी मुनगंटीवार यांनी एका वाघाची प्रतिमा फडणवीस यांना भेट दिली. हा वाघ हुबेहुब शिवसेनेच्या वाघाप्रमाणे दिसणार होता. मुनगंटीवार यांनी हा वाघ देताच फडणवीस यांनाही स्मितहास्य आवरता आले नाही. अर्थात चंद्रपूरला वाघांचा जिल्हाही संबोधले जाते हा योगायोगही यावेळी जुळुन आला.

शिवसेनेतील धुसफूस ओळखत भाजपने योग्य ‘टायमिंग’ साधले व सेनेचे वाघ भाजपच्या गळाला लागले. त्याचे श्रेय महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांना जाते. त्यामुळे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक शब्दही न उच्चारता आपल्या स्वागतपर भेटीतून काय द्यायचा तो संदेश दिल्याची चर्चा बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या परिसरात रंगली.

त्यांच्या या स्वागतपर भेटींनी राजकीय वर्तुळात चर्चा तर सुरू झालीय शिवाय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या तोंडून ‘सुधीरभाऊ तुम्हाला मानावे लागेल..’ असे शब्द नक्कीच निघाले असतील यात शंकाच नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस चंद्रपुरात आले आणि वनमंत्र्यांच्या या स्वागताने भारून गेले असे म्हटले जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Chandrapur News
Devendra Fadnavis : पक्षासाठी आयुष्य वाहून देणाऱ्या दिवंगत नेत्यासाठी फडणवीसांनी 'बिझी शेड्यूल'मधूनही गाठलं मावळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com