Ajit Pawar Group : अजित पवारांचं शिंदेंच्या पावलावर पाऊल ? राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर भर, 'या' दोन तरुणांवर मोठी जबाबदारी

Ajit Pawar Appointed Sangram Kote Patil And Saleem Sarang Prominent Party Post : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शरद पवार गटाला आणखी एक धक्का...
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Maharashtra Politics News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. अजित पवार गटाकडून दोन तरुण पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून ही माहिती देण्यात आली आहे. सलीम सारंग यांची उपाध्यक्षपदी तर संग्राम कोते पाटील यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

Ajit Pawar
NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादीचा अजित पवार गट टाकणार 'टाॅप गिअर' ; जिल्हाध्यक्षांना मिळणार 'हे' मोठं गिफ्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मंजुरीने सलीम सारंग यांची प्रदेश उपाध्यक्षपदी तर प्रदेश सरचिटणीसपदी संग्राम कोते पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

संग्राम कोते-पाटील यांना युवक व विद्यार्थी विभागाच्या प्रदेश समन्वयकपदाची जबाबदारीही यावेळी सोपविण्यात आली. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सलीम सारंग आणि संग्राम कोते पाटील यांची जबाबदारी असणार आहे. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोण आहेत संग्राम कोते पाटील?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात विरोधी पक्षात असताना कोते यांनी प्रभावीपणे राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक काँग्रेसची बांधणी केली. त्याची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक भाषणांमध्ये घेतली होती. कोते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील आहेत. तसेच राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात संग्राम कोते यांची प्रदेश सचिव पदावर नियुक्ती केली होती.

सलीम सारंग कोण आहेत?

सलीम सारंग हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांची सप्टेंबर 2021 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी काम केले आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना 'मुंबईरत्न' हा पुरस्कार देण्यात आला होता.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही तातडीने आपल्या गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. राज्यात ठिकाठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे केले. या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने संपूर्ण राज्यात शिवसेनेची फूट ही खोलवर गेली. तर शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आली होती.

Ajit Pawar
Ajit Pawar Group News : नवाब मलिक अजितदादांना भेटले; बंद दाराआड दीड तास चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com