Statement from Nagpur : महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात अर्धा डझनपेक्षा मराठा मुख्यमंत्री होऊन गेले. त्यानंतरही मराठा आरक्षण याबाबत ओबीसी नेत्यांना कसा काय दोष देता येईल, असा प्रश्न राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. उपराजधानी नागपूर येथे बुधवारी (ता. ८) मुनगंटीवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी याविषयावर भाष्य केलं.
मुनगंटीवार म्हणाले, ओबीसी प्रवर्गाला आरक्षण आहेच. सर्वोच्च न्यायालयानं, संसदेनं त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळं याबाबत न्यायालयात याचिका दाखल करून काही फायदा होईल असं वाटत नाही. ओबीसी प्रवर्गाला जे आरक्षण देण्यात आलय ते आरक्षण संसदेनं दिलेलं आहे. ओबीसींच्या आरक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यासारखं कोणतंही कारण नाही दिसत नाही. यासंदर्भात न्यायालय योग्य निर्णय देईल, असं ते म्हणाले. (Minister Sudhir Mungantiwar speaks on Maratha & OBC Reservation topic at Nagpur)
ज्यांच्याकडे कुणबी म्हणुन दाखला असेल किंवा ज्यांची कुणबी म्हणुन नोंद असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे. शासनाच्या या निर्णयाला मंत्री छगन भुजबळ यांचा पाठिंबा आहे. भुजबळांचं असं म्हणणं आहे की, सर्वांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं योग्य नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढला पाहिजे, ही सर्वांचीच भूमिका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वारंवार हेच सांगत आहेत, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
ओबीसींना जे आरक्षण मिळालं आहे. ते संसदेनं पारीत केलय. त्यामुळं त्याला घटनाबाह्य म्हणणं तर्कसंगत होणार नाही. राज्य शासनानं शिंदे समितीची नेमणूक केलीय. या समितीमध्ये न्यायमूर्तींचाही समावेश आहे. समिती काय करतेय, याची थोडी प्रतीक्षा केली गेली पाहिजे असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही मुद्द्यावर उगाच राजकीय भाष्य करून काही उपयोग होत नाही.मनोज जरांगे पाटील यांनी आधीच आपलं आंदोलन स्थगित केलंय. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना भेटावं वैगरे याचा काहीही अर्थ नाही, असं त्यांनी नमूद केलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कार्तिकी पुजेमध्ये कोणते उपमुख्यमंत्री सहभागी होतील, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय दिलाय. योग्य वेळ आली की सर्वांना त्याबद्दल कळेलच असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. मंत्रिमंडळातील बैठकीला आपली अनुपस्थिती याबद्दल मुनगंटीवार म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे विषय आहेत, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आधीच आपली चर्चा झालीय. त्यांच्या परवानगीनेच आपण या बैठकीला अनुपस्थित राहात असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट सांगितलं.
Edited by : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.