CM Eknath Shinde & Sudhir Mungantiwar in Kupwada of Jammu Kasmir.
CM Eknath Shinde & Sudhir Mungantiwar in Kupwada of Jammu Kasmir.Sarkarnama

Shivaji Maharaj Statue : कुपवाड्यातील पुतळ्याचा अनावरणाचा सोहळा ठरला ‘टॉप ट्रेंडिंग’

Indo Pak Border : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी सैन्य दलाला मिठाई भरवत साजरा केला क्षण
Published on

Eknath Shinde & Sudhir Mungantiwar in Jammu & Kashmir : जम्मू काश्मीरातील कुपवाडा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी (ता. 7) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण पार पडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची मान अभिमानानं ऊंच केली. थेट प्रक्षेपणामुळं देश-विदेशातील भारतीयांना या सोहळ्याचं साक्षीदार होता आलं. विशेष म्हणजे थेट ट्विटरवर (एक्स) मंगळवारी रात्री उशिरापर्यंत #ChhatrapatiAtIndoPakBorder या हॅशटॅगनं हा सोहळा ‘टॉप ट्रेंडिंग’ ठरला.

आम्ही पुणेकर संस्था आणि 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडला. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं भारत-पाक प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ हा पुतळा उभारला गेलाय, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. (The unveiling ceremony of Shivaji Maharaj's statue at Kupwara in Jammu & Kashmir in presence of CM Eknath Shinde & Minister Sudhir Mungantiwar became top trending on social media)

कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली. जम्मू काश्मिरातून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सुरू झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या जगभरातील असंख्य नेटकऱ्यांनी ट्विटरवर (एक्स) हा क्षण टॉप ट्रेंडिंगमध्ये सगळ्यात वरच्या क्रमांकावर आणला.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अशात दिवाळी अगदी काही दिवसांवर आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भारतीय सैन्यदलातील अधिकारी व जवानांना फराळाचं वितरणही केलं. दोन्ही नेत्यांनी आपल्या हातानं अधिकारी व कर्मचाऱ्यांना मराठमोळ्या चकल्या, लाडू, चिवडा भरवत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सैनिकांना ब्रिटन येथून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं भारतात कशी येत आहेत, याबद्दल माहिती दिली. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत कोणकोणते उपक्रम राबविले, याबद्दलही शिंदे यांनी ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियनला माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आल्यानंतर ती कुठे कुठे पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे, याबद्दल बटालियनमधील अधिकारी, जवानांनी मुनगंटीवार यांच्याकडुन जाणुन घेतलं. हे सारं ऐकताना सैन्यदलातील जवानही भारावुन गेले होते.

दिवाळीला काहीच दिवस उरले असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं भारत-पाक प्रत्यक्ष ताबा रेषेवर अनाहुतपणे घडुन आलेला स्नेहमिलनाचा क्षण महाराष्ट्रातील दोन्ही नेते व भारतीय सैन्य दलातील जवानांसाठी अनोखा आणि अविस्मरणीय ठरला.

Edited by : Atul Mehere

CM Eknath Shinde & Sudhir Mungantiwar in Kupwada of Jammu Kasmir.
Bachchu Kadu VS Sudhir Mungantiwar : वाघनखांवरून बच्चू कडूंनी डिवचले, मग मुनगंटीवारांनी त्यांना आडव्या हाताने घेतले !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com