Bachchu Kadu Protest: बच्चू कडूंचा सरकारविरोधात पुन्हा एल्गार; अमरावतीत काढला भव्य मोर्चा

Bacchu Kadu On Shinde-Fadnavis-Pawar government : आमदार बच्चू कडू यांनी अमरावती विभागीय कार्यालयावर 'जन एल्गार मोर्चा' काढला.
Bachchu Kadu Protest
Bachchu Kadu ProtestSarkarnama
Published on
Updated on

Amravati Morcha News: आमदार बच्चू कडू यांनी सरकारविरोधात एल्‍गार पुकारला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बुधवारी अमरावती विभागीय कार्यालयावर 'जन एल्गार मोर्चा' काढला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चाला हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. मात्र, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस-पवार सरकारला पाठिंबा असतानाही आपल्याच सरकार विरोधात मोर्चा काढल्याने चर्चांना उधाण आले आहे.

"नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान देण्यात यावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत करावी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ सुरू करावे", यासह आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शेतकऱ्यांबरोबर संवाद साधताना "सत्तेत असणे म्हणजे मान खाली घालून वागणे नाही", असा थेट इशाराही बच्चू कडूंनी सरकारला दिला.

Bachchu Kadu Protest
Tanaji Sawant Allegation : काका-भाच्याने गुत्तेदार जगवले, हप्ते गोळा केले ? सावंतांचा रोख कुणाकडे ?

"राज्यातील प्रत्येक आपण जाणार असून जनतेला जागृत करण्याचे काम प्रहार करणार आहे. आपल्या मागण्या तीन महिन्यात पूर्ण नाही झाल्या तर शेतकऱ्यांना घेऊन पुन्हा आंदोलन करणार", असा थेट इशारा बच्चू कडूंनी राज्य सरकारला दिला. बच्चू कडूंनी पुन्हा एकदा आपल्याच सरकार विरोधात दंड थोपाटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Bachchu Kadu Protest
Municipal Medical College: 20 कोटींच्या वसुलीला 'सरकारनामा'चा बूस्टर डोस ; पोलीस तपासात होणार मेडिकल कॉलेजचे पोस्टमार्टेम

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून असतानाच आता पुन्हा एकदा बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर देत अमरावतीत सरकारविरोधात भव्य मोर्चा काढला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com